14 December 2019

News Flash

‘इंडियाज डॉटर’ : दोघा वकिलांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

बीबीसीच्या ‘इंडियाज डॉटर’ या माहितीपटात महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या व आरोपींचे वकील असलेल्या दोघांना न्यायालयाने म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

| March 25, 2015 01:07 am

बीबीसीच्या ‘इंडियाज डॉटर’ या माहितीपटात महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या व आरोपींचे वकील असलेल्या दोघांना न्यायालयाने म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. या दोन्ही वकिलांना त्याबाबत नोटिसा देण्यात आल्या असून त्यांचे म्हणणे मांडण्यास दोन आठवडय़ांचा कालावधी दिला आहे. या दोन वकिलांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी महिलांच्या वकील संघटनेने केली आहे.
व्ही. गोपाल गौडा व सी. नागप्पन यांच्या पीठाने सांगितले की, आम्ही युक्तिवाद ऐकला आहे व या प्रकरणी सत्यस्थितीवर व कायदेशीर बाबींवर विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे अॅड. एम.एल.शर्मा व ए.पी.सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटिसा बजावल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयातील महिला वकील संघटनेने ही याचिका दाखल केली होती. त्यात, या दोन वकिलांना सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात येण्यास बंदी घालावी कारण त्यांनी बीबीसीच्या माहिती पटात अमानवी, संतापजनक व आजारी मानसिकता दाखवणारी विधाने केली आहेत, त्यामुळे महिलांच्या सभ्यतेचा भंग झाला आहे. विशेषत: सर्वोच्च न्यायालयात काम करणाऱ्या महिला वकिलांना त्यामुळे जबर धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने महिला वकिलांच्या संघटनेला पाठिंबा दिला आहे. वरिष्ठ वकील विभा दत्ता मखिजा यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने आता शून्य सहनशीलता दाखवावी. जिथे निर्भयतेने राहता येईल असे वातावरण आम्हाला हवे आहे.
वकिलांच्या संघटनेच्या वतीने बाजू मांडताना दुश्यंत दवे यांनी सांगितले की, लिंगभावाबाबत संवेदनशीलता निर्माण झाली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने शर्मा यांच्याविरोधात कारवाई करण्याचे ठरवले आहे. अॅड. महालक्ष्मी पवनी, सर्वोच्च न्यायालयाचे निबंधक यांनी याचिका दाखल केली आहे.

First Published on March 25, 2015 1:07 am

Web Title: supreme court asks delhi gang rape lawyers to explain remarks on women
टॅग Indias Daughter
Just Now!
X