News Flash

दोन वर्षांत लोकपालांची नियुक्ती का नाही?

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला खडसावले

सुप्रीम कोर्ट

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला खडसावले

केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांत लोकपालांची नियुक्ती का केली नाही, असा सवाल बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने केला आणि याबाबत करण्यात आलेल्या कायद्याचे आम्ही कलेवर होऊ देणार नाही, असेही न्यायालयाने सरकारला खडसावले.

सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पीठाने स्पष्ट केले की, तीव्र संघर्षांनंतर लोकपाल कायदा मंजूर करण्यात आला, त्यामुळे विद्यमान सरकारची इच्छा नसली तरी लोकपालांची नियुक्ती केलीच पाहिजे. सरकारने आतापर्यंत यामध्ये सुधारणा का केली नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे.

लोकपाल संस्था कधी कार्यान्वित होईल याबाबत अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याकडे पीठाने मुदत मागितली. लोकपाल कायदा २०१४ मध्ये मंजूर होऊनही अद्याप लोकपालांची नियुक्ती करण्यात आली नाही या स्थितीबाबत सरकारला काहीच वाटत नाही, अशी विचारणाही पीठाने रोहतगी यांच्याकडे केली.

विद्यमान सरकारने, भ्रष्टाचाराने पोखरलेली यंत्रणा स्वच्छ करण्याचे ठरविले असतानाही दोन वर्षे होऊनही लोकपालांची नियुक्ती का करण्यात आली नाही, त्यामुळे लोकपालसारख्या संस्थेचे आम्ही कलेवर होऊ देणार नाही, असेही पीठाने यावेळी बोलताना स्पष्ट केले.

आपल्याला बदल हवा आहे. मात्र आपण लोकपालंची नियुक्ती करत नाही. केंद्र सरकारने लोकपालसाठी अंतिम तारीख ठरवण्याची गरज आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

लोकपाल विधेयकामध्ये संशोधन करायचे असल्याने हे विधेयक प्रलबिंत आहे. कायद्यानुसार, समितीमध्ये विपक्ष नेता आवश्यक आहे. मात्र सध्या असा नेता नाही. त्यामुळे सर्वात मोठय़ा पक्षाचा नेता समितीमध्ये सहभागी करण्यासाठी विधेयक प्रलंबित आहे, असे सरकारने यावर उत्तर देताना म्हटले आहे. आता यावरील पुढील सुनावणी ७ डिसेंबरला होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 2:27 am

Web Title: supreme court comment on central government over ombudsman appointed
Next Stories
1 हवामान करार, क्लिंटन यांच्यावर कारवाईच्या मुद्दय़ांवर डोनाल्ड ट्रम्प यांची नरमाईची भूमिका
2 भारताचा हल्ला हे सरळसरळ आक्रमणच शरीफ यांचा कांगावा
3 आकाशगंगेच्या प्रभामंडळात फिकट दीर्घिकेचा शोध
Just Now!
X