04 March 2021

News Flash

१७ एप्रिलपर्यंत पाच हजार कोटी भरा, सुप्रीम कोर्टाचे ‘सहारा’ला आदेश

पॅरोलमध्ये १७ एप्रिलपर्यंत वाढ

सुब्रतो रॉय (संग्रहित छायाचित्र)

सहारा समुहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉयच्या पॅरोलमध्ये सुप्रीम कोर्टाने १७ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. सुब्रतो रॉयने १७ एप्रिलपर्यंत पाच हजार कोटी जमा करावेत अशी अटही कोर्टाने टाकली आहे. पाच हजार कोटी भरण्यासाठी मालमत्ता विकण्याची मुभा सुब्रतो रॉयला देण्यात आली आहे.

सहारा समुहाचे सुब्रतो रॉयच्या पॅरोलसंदर्भात मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने सुब्रतो रॉयच्या पॅरोलमध्ये १७ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. पण तोपर्यंत ५ हजार कोटी रुपये जमा करावे असे आदेश कोर्टाने दिले. सहारा समुहाने मालमत्ता विकून १७ एप्रिलपर्यंत पैसे भरावेत. १० एप्रिलपर्यंत पाच हजार कोटी रुपयांपैकी बहुतांशी रक्कम जमा झाल्यास मालमत्तेच्या लिलावासाठी मुदतवाढ दिली जाईल असेही कोर्टाने स्पष्ट केले.

मंगळवारी झालेल्या सुनावणीत सहारा समुहाने लिलावासाठी १५ मालमत्तांची यादी दिली. यातील १३ मालमत्ता विकून एकूण पाच हजार कोटी रुपये मिळू शकतील असे सहाराच्या वतीने कोर्टात सांगण्यात आले. तसेच सहारा समुहाने फॉर्म्यूला वनमधील फोर्स वन या संघातील मालकी हक्क विकण्याची परवानगी मागितली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही मागणीही फेटाळून लावली. सहारा समुहाचे न्यूयॉर्कमधील प्लाझा हॉटेलमधील मालकी हक्क विकत घेण्यासाठी परदेशातील एका व्यावसायिकाने तयारी दर्शवली आहे. या व्यवहारासाठी ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजण्यास तयार असल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले. यावर सुप्रीम कोर्टाने या परदेशी व्यावसायिकाला १० एप्रिलपर्यंत कोर्टात ७०० कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले. ही रक्कम भरल्यावरच तुम्ही हॉटेल विकत घेण्यासाठी इच्छुक आहात हे ग्राह्य धरले जाईल असे कोर्टाने म्हटले आहे.

समभागधारकांचे २४,००० कोटी रुपये परत करावे यासाठी सेबीने न्यायालयामध्ये सुब्रतो रॉयविरोधात धाव घेतली होती. मार्च २०१४ मध्ये पहिल्यांदा सुब्रतो रॉयला अटक करण्यात आली होती. छोट्या गुंतवणूकदारांना खोटे बाँड विकून रॉय यांनी हजारो कोटी रुपये कमवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. ६ फेब्रुवारीरोजी झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने सहारा समुहाला मोठा दणका दिला होता. ३९,००० कोटी रुपयांची किंमत असलेल्या अॅम्बी व्हॅलीवर प्रकल्पावर जप्ती आणून पैसे वसूल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 5:32 pm

Web Title: supreme court directed sahara chief subrata roy to deposit rs 5092 crore extends paroles
Next Stories
1 ‘विसरभोळ्या’ इंजिनीअरच्या चुकीमुळे एअर इंडियाचे विमान उतरवले
2 २६ आठवड्यांच्या गर्भवती महिलेला सुप्रीम कोर्टाने गर्भपाताची परवानगी नाकारली
3 एटीएममधून निघाल्या सिरियल नंबर नसलेल्या ५०० च्या नोटा
Just Now!
X