29 March 2020

News Flash

राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबतची याचिका फेटाळली

कील एम.एल.शर्मा यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची केलेली मागणी न्यायालयाने याआधी फेटाळली होती.

| December 1, 2015 03:29 am

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कंपनी कायदा अधिकाऱ्यांपुढे ब्रिटिश नागरिक जाहीर केल्याने त्यांच्याविरोधात खटला दाखल करावा, या मागणीसाठी दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
सरन्यायाधीश एच.एल.दत्तू व न्या. अमिताव रॉय यांनी लोकहिताच्या याचिकेतील कागदपत्रांच्या अस्सलतेबाबत शंका उपस्थित केली. या किरकोळ याचिकेवर आपण चौकशीचे फेरे सुरू करायचे का, असा सवाल करीत न्यायालयाने याचिका फेटाळली. वकील एम.एल.शर्मा यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची केलेली मागणी न्यायालयाने याआधी फेटाळली होती. अलीकडेच भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी असा आरोप केला होता, की काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कंपनी कामकाज अधिकाऱ्यांपुढे आपण ब्रिटिश नागरिक असल्याची कबुली दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2015 3:29 am

Web Title: supreme court dismisses plea on rahul gandhi citizenship row
टॅग Rahul Gandhi
Next Stories
1 ‘सिमी’च्या २ कार्यकर्त्यांना १४ वर्षांची सक्तमजुरी
2 नेपाळला आपल्या बंदरांमार्गे वाहतुकीची बांगलादेशची तयारी
3 पंतप्रधान मोदींनी दिलेली जबाबदारी पूर्ण केल्यानंतरच निवृत्त होईन – मनोहर पर्रिकर
Just Now!
X