02 March 2021

News Flash

Nirbhya Case: दोषी पवन कुमार गुप्ताची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

या मुद्द्यामध्ये काहीही नवीन नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे

संग्रहित

२०१२ च्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातली पवन कुमार गुप्ता या दोषीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. जेव्हा गुन्हा घडला तेव्हा अल्पवयीन होतो त्यामुळे फाशी देऊ नये अशी याचिका पवन कुमारने केली होती. दिल्ली कोर्टाने हा मुद्दा दुर्लक्षित केला असंही याचिकेत नमूद करण्यात आलं होतं मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. या मुद्द्यामध्ये काहीही नवीन नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे आणि ही याचिका फेटाळली आहे.

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात पवनकुमार गुप्ताने गुन्ह्याच्या वेळी आपण अल्पवयीन होतो अशी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने सुनावणी घेत या याचिकेला काहीही अर्थ नसल्याचं म्हटलं आहे. दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी चार दोषींना १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता फाशी देण्यात येईल असा आदेश नव्याने जारी केला आहे. याआधी त्यांना २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता फाशी देण्यात येईल असे आदेश जारी करण्यात आले होते.

काय आहे निर्भया प्रकरण?

१६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिचा अत्यंत क्रूर पद्धतीने लैंगिक छळही करण्यात आला. या अत्याचारामुळे निर्भयाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. या जखमांशी झुंज देत उपचार घेत असताना निर्भयाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2020 3:33 pm

Web Title: supreme court dismisses special leave petition slp filed by convict pawan kumar gupta scj 81
Next Stories
1 हिंदी महासागरात चीनवर वचक ठेवणार भारताचा ‘टायगर’
2 जे.पी. नड्डा भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष
3 काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा
Just Now!
X