News Flash

दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा झटका, मुंबईतील करोडोंची संपत्ती जप्त करण्याचा आदेश

सर्वोच्च न्यायालयाने मोस्ट वॉण्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करण्याची परवानगी सरकारला दिली आहे

सर्वोच्च न्यायालयाने मोस्ट वॉण्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करण्याची परवानगी सरकारला दिली आहे. दाऊद इब्राहिमची आई अमीना आणि बहिण हसीना पारकर यांची याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे. दाऊदच्या मुंबईतील संपत्तीची किंमत कोटींमध्ये आहे. मुंबईतील नागपाडामध्ये दाऊदची संपत्ती आहे. ही संपत्ती हसीना आणि अमीना यांच्या नावावर आहे. दाऊदने बेकायदेशीरपणे ही संपत्ती गोळा केली होती अशा माहिती तपास यंत्रणांनी दिली होती, ज्या आधारे हसीना आणि अमीना यांची याचिका फेटाळण्यात आली. हसीना आणि अमीना या दोघींचाही मृत्यू झालेला आहे.

१९८८ मध्ये सरकारने कायद्याअंतर्गत तस्करी, परदेशी चलन घोटाळा करणारे आणि त्यांच्या नातेवाईकांची संपत्ती जप्त केली होती. दाऊदच्या बहिण आणि आईने संपत्ती जप्त करण्याला न्यायालायात आव्हान दिलं होतं. १९९३ साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊदला फरार घोषित करण्यात आलं होतं, त्यानंतर संबंधित विभांगांनी त्याची संपत्ती जप्त करण्याच्या कारवाईला सुरुवात केली होती.

हसीना आणि अमीना यांची याचिका ट्रिब्यूनल आणि दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली होती. ज्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. संपत्ती जप्त करण्याच्या नोटीसला आव्हान देण्यासाठी आपल्याला वेळ देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली होती. आपल्याला योग्यरित्या नोटीस देण्यात आली नसल्याचा दावा त्यांनी केला होता.

नियमांनुसार, जप्तीच्या नोटीसला ४५ दिवसांच्या आत आव्हान दिलं गेलं नसल्याने त्यांची याचिका फेटाळण्यात आी होती. दोघींनाही इतकी मोठी संपत्ती कोठून आली हे सांगण्यासाठी पुरेपूर वेळ देण्यात आला होता. मात्र त्या स्पष्ट करु शकल्या नव्हत्या ज्यानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचललं होतं. दाऊदच्या दक्षिण मुंबईतील हॉटेल आणि गेस्ट हाऊसचा गतवर्षी लिलाव करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 11:48 am

Web Title: supreme court grant persmission to seize dawoods property in mumbai
Next Stories
1 लाट ओसरली, प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान मोदींना स्थान नाही
2 नरोडा पाटिया हत्याकांडाप्रकरणी गुजरातच्या माजी मंत्री माया कोडनानी दोषमुक्त
3 ९७ जणांचा बळी घेणारे गुजरातमधील नरोडा पाटिया प्रकरण नेमके काय?
Just Now!
X