24 February 2021

News Flash

‘राम मंदिर नक्की होणार, कारण सुप्रीम कोर्ट आमचं आहे’ – भाजपा आमदार

''हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे आणि सर्वोच्च न्यायालय आमचं आहे''

भाजपानं पुन्हा राम मंदिराचा राग आळवला आहे. उत्तर प्रदेशमधील भाजपा आमदार मुकुट बिहारी वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालय आणि राम मंदिराबाबत एक मोठं विधान केलं आहे. राम मंदिर नक्कीच बनेल कारण सर्वोच्च न्यायालय आमचं आहे, असं वर्मा म्हणाले आहेत.

वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, ‘भाजपा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकली आहे, पण राम मंदिर नक्कीच बनेल कारण आम्ही राम मंदिराबाबत कटिबद्ध आहोत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे आणि सर्वोच्च न्यायालय आमचं आहे. असं वर्मा म्हणाले.


मुकुट बिहारी वर्मा हे उत्तर प्रदेशच्या कैसरगंज येथून आमदार आहेत. यापूर्वी खुद्द उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिर वेळेवर बांधलं जाईल, नियतीत जे असेल ते कोणीही टाळू शकत नाही, असं विधान केलं होतं. तर येथील उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी राम मंदिराचा मुद्दा जर चर्चेने सोडवला गेला नाही तर संसदेत कायदा बनवून राम मदिर उभारण्याच्या दिशेने पावलं टाकू, असं म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2018 11:36 am

Web Title: supreme court is ours so ram mandir will be constructed says bjp mla mukut bihari verma
Next Stories
1 प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने मरण्याचा अधिकार : सरन्यायाधीश
2 तामिळनाडू : अटक केलेल्या योगेंद्र यादव यांची रात्री उशीरा सुटका
3 यशवंत सिन्हा यांनी निवडणूक लढवावी, केजरीवालांची विनंती
Just Now!
X