सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांना करोनाची लागण झाली आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांच्या एका कर्मचाऱ्याला देखील करोनाची लागण झाली आहे

न्या. चंद्रचूड यांची तब्येत बरी असली तरी त्यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर कोणतीही सुनावणी होणार नाही आहे. देशातील कोविड -१९च्या संकटा संदर्भातील सुनावणी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाद्वारे होत आहे. गुरूवारी या प्रकरणावर सुनावणी होणार होती. मात्र त्या आधीच न्यायमूर्ती चंद्रचूड यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे  न्यायाधीशांच्या अनुपस्थितीमुळे सुनावणी पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.