नवी दिल्ली : मशीद ही इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग नसल्याच्या निकालाविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालय गुरुवारी निर्णय देण्याची शक्यता आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१०मध्ये वादग्रस्त जमिनीच्या त्रिभाजनाचा निर्णय दिला होता. त्या निर्णयाविरोधातील याचिकांच्या सुनावणीत मशीदीचा हा मुद्दा येणार आहे.

१९९४मध्ये एम. इस्माईल फारूकी विरुद्ध भारत सरकार या खटल्यात पाच सदस्यीय पीठाने मशीद ही इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग नसल्याचा निर्वाळा दिला होता. त्यानुसार वादग्रस्त जमिनीचे सरकारला अधिग्रहण करता येईल, असे पाच सदस्यीय पीठाने तेव्हा स्पष्ट केले होते. त्या निकालाचा  विस्तारित पीठाकडून पुनर्विचार केला जावा, अशी मागणी अयोध्या मालमत्ता वादात पुढे आली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे त्रिसदस्यीय पीठ गुरुवारी दुपारी दोन वाजता निर्णय देण्याची शक्यता आहे.