News Flash

“तेलंगणमध्ये केलं तसंच….”, विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची युपी सरकारला विचारणा

विकास दुबे एन्काऊंटप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

“तेलंगणमध्ये केलं तसंच….”, विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची युपी सरकारला विचारणा
संग्रहित

उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड विकास दुबेच्या एन्काऊंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालय निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशच्या विशेष पोलीस पथकाने विकास दुबेला चकमकीत ठार केलं. विकास दुबे आणि त्याच्या टोळीने उत्तर प्रदेशच्या आठ पोलिसांची हत्या केली होती. तेव्हापासून तो फरार होता. मध्य प्रदेशातून अटक करुन उत्तर प्रदेशला आणत असताना विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी चकमकीत त्याला ठार करण्यात आलं.

सर्वोच्च न्यायालायात याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाच्या देखरेखेखाली सीबीआय किंवा एनआयएच्या मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला कोणत्या प्रकारची समिती हवी आहे अशी विचारणा केली असून उत्तर देण्यासाठी गुरुवारपर्यंत वेळ दिला आहे. २० जुलै रोजी याप्रकरणी पुढील सुनावी होणार आहे.

“तेलंगणमध्ये केलं तसंच काहीसं आम्ही येथे करु. कोणत्या प्रकारची समिती तुम्हाला हवी आहे ते सांगा,” असं सरन्यायाधीशांनी तेलंगणच्या एन्काऊंटरचा उल्लेख करताना म्हटलं आहे. तेलंगण पोलिसांनी २७ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन हत्या करणाऱ्या चार आरोपींना चकमकीत ठार केलं होतं. ताब्यात असणाऱ्या आरोपींनी आपल्यावर काठी आणि दगडाने हल्ला करण्यास सुरुवात केल्याने त्यांना ठार केल्याचं तेलंगण पोलिसांनी सांगितलं होतं. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने लगेचच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली होती. अद्याप समितीने आपला अहवाल सादर केलेला नाही.

सुनावणीदरम्यान योगी आदित्यनाथ सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी राज्य सरकारला अजून थोडा वेळ देण्याची मागणी केली. “कृपया आम्हाला वेळ द्या. आम्ही प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अनेक गोष्टी सार्वजनिक आहे. मला सर्व तथ्य एकत्र करुन न्यायालयासमोर मांडण्यासाठी वेळ लागेल,” असं त्यांनी म्हटलं. २० जुलै रोजी याप्रकरणी पुढील सुनावी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 7:36 am

Web Title: supreme court on uttar pradesh vikas dubey encounter case sgy 87
Next Stories
1 गेहलोत सरकार ‘पायलट’विना!
2 मुंबईपेक्षा पुण्यात अधिक रुग्ण
3 देशभरात ९ लाखांचा आकडा पार
Just Now!
X