News Flash

सुप्रीम कोर्टाकडून धोनीला दिलासा, फौजदारी कारवाई रद्द करण्याचे आदेश

एप्रिल २०१३च्या अंकामध्ये धोनीचे भगवान विष्णूच्या रुपातील छायाचित्र होते.

एका मासिकाच्या एप्रिल २०१३च्या अंकामध्ये धोनीचे भगवान विष्णूच्या रुपातील छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. छायाचित्रात धोनीच्या हातांमध्ये विविध कंपन्यांची उत्पादने दाखविण्यात आली होती.

एका सुप्रसिद्ध मासिकाच्या मुखपृष्ठावर छापण्यात आलेल्या वादग्रस्त जाहिरातीप्रकरणात भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिलासा दिला. त्याच्याविरोधातील फौजदारी कारवाई रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
एका मासिकाच्या एप्रिल २०१३च्या अंकामध्ये धोनीचे भगवान विष्णूच्या रुपातील छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. छायाचित्रात धोनीच्या हातांमध्ये विविध कंपन्यांची उत्पादने दाखविण्यात आली होती. त्यामध्ये एक बूटही दाखविण्यात आला होता. त्यामुळे मोठा वाद उफाळून आला. या जाहिरातीचा विरोध करत या जाहिरातीतून धोनीने देशातील जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार जयकुमार हिरेमठ या सामाजिक कार्यकर्त्याने अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांकडे केली होती. याची दखल घेऊन देवी-देवतांचा अवमान करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कलम २९५ अंतर्गत धोनीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार धोनीला न्यायालयात उपस्थित राहण्याचे समन्स देखील धाडण्यात आले होते. त्यानंतर धोनीने त्याविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
विश्व हिंदू परिषदेचे स्थानिक नेते वाय. शामसुंदर यांनी या छायाचित्राविरोधात अनंतपूरमधील न्यायालयात याचिका दाखल केली. धोनीने या छायाचित्राच्या माध्यमातून हिंदूंच्या भावना दुखावल्या असल्याचा युक्तिवाद शामसुंदर यांच्या वकिलांनी न्यायालयात केला होता. याच छायाचित्रावरून धोनीविरोधात दिल्ली, पुणे आणि अन्य शहरांमध्येही याचिका दाखल करण्यात आली होत्या. पण आता सर्वोच्च न्यायालयाने फौजदारी कारवाई रद्द करण्याचे आदेश दिल्यामुळे धोनीला दिलासा मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 12:59 pm

Web Title: supreme court quashes criminal proceedings against ms dhoni for allegedly portraying himself as lord vishnu on a magazine cover page
Next Stories
1 VIDEO: त्या पोलीस अधिकाऱ्याने स्वत:वरच केली ‘टेसर गन’ची चाचणी
2 ‘फुटीरवाद्यांचा इन्सानियत, काश्मिरियत, जमुरियतवर विश्वास नाही’
3 समाजवादी पक्षाची ‘स्मार्ट’ योजना, निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना स्मार्टफोनचे गाजर
Just Now!
X