News Flash

सीबीआय चौकशीची मागणी; जनहित याचिका फेटाळली

याचिकाकर्ते वकील एम. एल. शर्मा यांनी या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली

| February 14, 2020 02:25 am

गार्गी महाविद्यालय विनयभंग प्रकरण

नवी दिल्ली : केवळ महिलांसाठी असलेल्या गार्गी महाविद्यालयात आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात गेल्या आठवडय़ात काही विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आला त्याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेची सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दखल घेतली नाही.

याचिकाकर्ते वकील एम. एल. शर्मा यांनी या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली, मात्र सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने शर्मा यांना दिल्ली उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. आपण दिल्ली उच्च न्यायालयात का दाद मागत नाहीत, त्यांनी याचिका फेटाळली तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करा, असे पीठाने स्पष्ट केले. याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचे मत जाणून घेण्याची आमची इच्छा आहे, असे पीठाने सांगितले.

या प्रकरणाशी संबंधित असलेला इलेक्ट्रॉनिक पुरावा नष्ट केला जाईल, अशी भीती या वेळी शर्मा यांनी व्यक्त केली. पोलीस चकमकीबाबतचा इलेक्ट्रॉनिक पुरावा जतन करण्याचे आदेश ज्याप्रमाणे तेलंगण उच्च न्यायालयाने दिले त्याप्रमाणे दिल्ली उच्च न्यायालयही आदेश देऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

गार्गी महाविद्यालयामध्ये ६ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना पुरुषांचा एक गट तेथे घुसला आणि त्यांनी विद्यार्थिनींशी गैरवर्तन केले होते. हा प्रकार घडत असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 2:25 am

Web Title: supreme court rejects cbi inquiry petition in gargi college molestation case zws 70
Next Stories
1 कलंकित राजकीय नेत्यांना वेसण!
2 गोव्यात कॅसिनोतील कर्मचारी, पाहुण्यांना ओलीस ठेवून दंगल
3 काँग्रेस नेते शाहीन बागला जाणार नाहीत कारण…
Just Now!
X