29 February 2020

News Flash

महात्मा गांधींना भारतरत्न; सर्वोच्च न्यायालय म्हणतं…

देशाने महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी दिली आहे

महात्मा गांधी यांना भारतरत्न द्या अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. आपल्या देशाच्या जनतेने महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही उपाधी दिली आहे. एवढंच नाही तर महात्मा गांधींबाबत प्रत्येक भारतीयांच्या मनात आदर आहे. राष्ट्रपिता उपाधी सगळ्या देशानं त्यांना देणं हा सर्वोच्च सन्मान आहे. अशा महात्मा गांधींना भारतरत्न द्या असे निर्देश केंद्र सरकारला देणं हा न्याय योग्य विषय नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

महात्मा गांधी यांना देश राष्ट्रपिता मानतो. ही त्यांना देण्यात आलेली सर्वोच्च उपाधी आहे. यासंबंधी केंद्र सरकारने अहवाल सादर करावा असं आम्ही सांगू शकतो. मात्र त्यांना भारतरत्न द्या असे निर्देश आम्ही देऊ शकत नाही. महात्मा गांधी यांना अधिकाधिक उपाधी दिल्या जाव्यात या याचिकेशी कोर्ट सहमत आहे असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं.

एवढंच नाही तर महात्मा गांधी हे भारतरत्न पुरस्कारापेक्षाही मोठे आहेत. फक्त भारतातच नाही तर जगभरात महात्मा गांधी यांची ख्याती आहे. त्यामुळे महात्मा गांधींना भारतरत्न द्या अशी मागणी करणारी जनहित याचिका आम्ही फेटाळून लावत आहोत असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. आजवर अनेक दिग्गज नेत्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. अशाच प्रकारचा सन्मान महात्मा गांधी यांचाही करण्यात यावा अशी मागणी करणारी एक जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. हा निर्णय केंद्र सरकारचा असून हा मुद्दा न्यायालयाच्या अधिकार कक्षेबाहेर असेही कोर्टाने म्हटले आहे.

भाजपाकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या अशी मागणी होते आहे. भाजपा जर आग्रही आहे तर आम्ही महात्मा गांधींना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून आग्रही का राहू नये असा प्रश्न काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केला होता. मात्र त्यावेळी रविशंकर प्रसाद यांनी या प्रश्नाला उत्तर देत काही नेते पुरस्कारापेक्षा श्रेष्ठ असतात महात्मा गांधी हे असेच नेते आहेत असं उत्तर दिलं होतं.

 

 

First Published on January 17, 2020 6:45 pm

Web Title: supreme court rejects mahatma gandhi bharat ratna petition says father of nation was far above from such award scj 81
Next Stories
1 निर्भयाच्या दोषींना 1 फेब्रुवारीला फासावर लटकवणार, नवं डेथ वॉरंट जारी
2 फरार कुख्यात दहशतवादी जलीस अन्सारीला कानपूरमधून अटक
3 Amazon Jeff Bezos : पत्रास कारण की… भारतीयांसाठी अ‍ॅमेझॉनच्या जेफ बेझोस यांचे खुले पत्र
X
Just Now!
X