News Flash

मुंबईत पुन्हा डान्सबारची छमछम; सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

महाराष्ट्रातील डान्सबारवर बंदी घालण्याचा राज्य सरकारचा निर्णय घटनेतील समानतेच्या तत्त्वाविरोधात असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला.

| July 16, 2013 11:12 am

मुंबईत पुन्हा डान्सबारची छमछम; सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

महाराष्ट्रातील डान्सबारवर बंदी घालण्याचा राज्य सरकारचा निर्णय घटनेतील समानतेच्या तत्त्वाविरोधात असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे डान्सबार चालकांना दिलासा मिळाला असून, मुंबईमध्ये डान्सबार पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डान्सबारवर गेल्या सहा वर्षांपासून असलेली अंतरिम स्थगितीही न्यायालयाने उठविली.
२००५ मध्ये गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यातील डान्सबारवर बंदी घातली होती. त्यावेळी सुमारे ७०० डान्सबार राज्यात सुरू होते. डान्सबारमध्ये सुमारे ७० हजार तरुणी काम करीत होत्या. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात डान्सबार असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने त्यावेळी मुंबई पोलिस कायद्यातील डान्सबारवर बंदी घालणारी तरतुद ही घटनेतील समानतेच्या तत्त्वाविरोधात असल्याचे म्हटले होते आणि डान्सबार चालकांच्या बाजूने निर्णय दिला होता. हाच निर्णय मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता डान्सबार सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डान्सबार चालकांना महाराष्ट्रात डान्सबार सुरू करण्यासाठी नव्याने परवाने घ्यावे लागणार आहेत, असे डान्सबार असोसिएशनचे वकील अनंत ग्रोव्हर यांनी पत्रकारांना सांगितले.
आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही – मनजित सिंह
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय माणुसकीच्या बाजूने असून, त्यामुळे आम्हाला किती आनंद झाला आहे, याचे शब्दांत वर्णन करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया डान्सबार असोसिएशनचे अध्यक्ष मनजितसिंह यांनी व्यक्त केली. डान्सबारमध्ये कोणतेही गैरप्रकार चालत नसल्याचे सांगत या निकालामुळे अनेक लोकांची घरे पुन्हा बसतील, असेही ते म्हणाले. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2013 11:12 am

Web Title: supreme court ruled bombay high courts decision on dance bar in maharashtra
टॅग : Dance Bar
Next Stories
1 चार अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर सामुहिक बलात्कार
2 सीबीआय म्हणते, संचालकांचा कालावधी कमीत कमी तीन वर्षांचा हवा
3 बिहारमधील न्यायालय परिसरात दोन बॉम्बस्फोट
Just Now!
X