दिल्लीमधील पाचवर्षीय बालिकेवरील बलात्काराविरोधात निदर्शने करणाऱया मुलींवर बळाचा वापर केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिल्ली पोलिसांना फटकारले. निदर्शने करणाऱया मुलींवर बळाचा वापर का केला, याचा खुलासा करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना दिले आहेत. या प्रकरणी गुरुवारी न्यायालयात सुनावणी झाली. 
पूर्व दिल्लीतील बालिकेवर झालेल्या अमानुष बलात्काराच्या निषेधार्थ दिल्लीमध्ये गेल्या शुक्रवारपासून महिला व विद्यार्थी संघटना तसेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानांसह ठिकठिकाणी जोरदार निदर्शने केली. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे भडकलेले सर्वसामान्य नागरिक उग्र निदर्शने करीत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. निदर्शने करणाऱया एका महिलेवर पोलिस अधिकाऱयाने बळाचा वापर केला होता. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने पोलिसांना फटकारले आहे.