25 February 2021

News Flash

स्किन टू स्किन लैंगिक अत्याचार; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

मूळ प्रकरण काय?

संग्रहित छायाचित्र

शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला नसेल तर तो लैंगिक अत्याचार ठरू शकत नाही. अल्पवयीन मुलीच्या खासगी भागाला स्पर्श केला, तरच पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठाने दिला होता. या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. न्यायालयाचा हा निकाल धोकादायक दाखला ठरतो, अशी भीती महाधिवक्त्यांनी व्यक्त केल्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिला.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठाने प्रत्यक्ष त्वचेशी संपर्क नसल्यानं केवळ मुलीच्या स्तनांना हात लावला म्हणून पोक्सो कायद्यातंर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होत नाही, असा निकाला न्यायालयानं देत आरोपीला जामीन मंजुर केला होता. या निर्णयाला राष्ट्रीय महिला आयोगाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आज (२७ जानेवारी) याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी महाधिवक्त्यांनी उच्च न्यायालयाचा हा निकाल धोकादायक दाखला आहे, असा युक्तीवाद सर्वोच्च न्यायालयात केला. यावेळी न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठाने निर्णयाला स्थगिती दिली असून, आरोपीला नोटीस बजावण्यात आली आहे. दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मूळ प्रकरण काय?

२०१६ मध्ये ही घटना घडली होती. सतीश नावाच्या एका ३९ वर्षीय आरोपीनं १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. पीडित मुलीची साक्ष नोंदवून पोक्सो कायद्यातंर्गत आरोपी सतीशला सत्र न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. या निर्णयाला नागपूर खंठपीठात आव्हान देण्यात आलं होतं. त्यावर न्यायालयानं हा निकाल दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2021 1:17 pm

Web Title: supreme court stays bombay high court no skin touch no assault verdict bmh 90
Next Stories
1 करोना लसीची भीती कायम! ६० टक्के भारतीयांच्या मनात संशयकल्लोळ
2 कुलगाममध्ये दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात चार जवान जखमी
3 पोलिसांची गोळी लागल्याने नव्हे तर ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू, बघा थरारक CCTV फुटेज
Just Now!
X