News Flash

तेजपाल यांच्याविरोधातील खटल्याच्या सुनावणीला स्थगिती

महिला सहकाऱयाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले 'तहलका'चे संस्थापकीय संपादक तरूण तेजपाल यांच्या खटल्याच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तीन आठवड्यांची स्थगिती दिली.

| January 16, 2015 01:42 am

महिला सहकाऱयाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले ‘तहलका’चे संस्थापकीय संपादक तरूण तेजपाल यांच्या खटल्याच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तीन आठवड्यांची स्थगिती दिली.
खटल्याच्या सुनावणीसाठी आवश्यक कागदपत्रे न दिल्याने तेजपाल यांच्या वकीलाने सुनावणीला स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. त्यावर सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने सत्र न्यायालयातील सुनावणीला स्थगितीचे आदेश दिले.
सरकारी पक्षाने या खटल्यातील सर्व आवश्यक कागदपत्रे तेजपाल यांना द्यावीत, असेही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तेजपाल यांनी पणजीमध्ये झालेल्या ‘तहलका’च्या एका कार्यक्रमादरम्यान एका महिलेचे लिफ्टमध्ये लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, त्यावर पणजीमध्ये सुनावणी सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2015 1:42 am

Web Title: supreme court stays trial of sexual assault case against tarun tejpal
टॅग : Tarun Tejpal
Next Stories
1 ओबामांच्या भारत दौऱयावेळी दहशतवादी हल्ल्यांची शक्यता
2 कतरिना कैफ राष्ट्रपती व्हायला पाहिजे! – मार्कंडेय काटजू
3 नक्वी यांना वर्षभराचा तुरुंगवास
Just Now!
X