सर्वोच्च न्यायालयानं BS-IV वाहनांच्या नोंदणीवर स्थगिती दिली आहे. पुढील आदेश येईपर्यंत न्यायालयानं नोंदणीसाठी स्थगिती दिली. मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात BS-IV गाड्यांच्या झालेल्या विक्रीवर शंका उपस्थित करत या प्रकरणात काही गडबड असल्याचंही न्यायलयानं नमूद केलं. सध्या देशात सरकारच्या आदेशानुसार BS-VI गाड्यांची विक्री सुरू करण्यात आली आहे.

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं BS-IV वाहनांच्या विक्रासाठी लॉकडाउनच्या नंतरच्या १० दिवसांच्या दिलेल्या मुदतीचा आपला आदेश मागे घेतला होता. तसंच या १० दिवसांमध्येच विक्री करण्यात आलेल्या BS-IV वाहनांचीच नोंदणी करण्यास न्यायालयानं सांगितलं होतं. न्यायालयाच्या आदेशानंतर ३१ मार्च पश्चात विक्री करण्यात आलेल्या वाहनांची नोंदणी थांबवण्यात आली होती.

यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं फेडरेशन ऑफ ऑटॉमोबिल डिलर असोशिएशनतीदेखेली कान उघडणी केली होती. आता ज्या BS-IV वाहनांची विक्री करण्यात येत आहे ते न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन असल्याचंही न्यायालयानं म्हटलं होतं. तसंच विक्रेत्यांवरही आम्ही कारवाई करू शकतो, असंदेखील न्यायलयानं स्पष्ट केलं होतं. देशात १ एप्रिलापासून BS-VI नियम लागू करण्यात आले आहेत.