News Flash

कर्नाटकच्या अपात्र आमदारांच्या याचिकेवर सुनावणी होणार

कर्नाटक विधानसभेच्या १५ जागांसाठी पोटनिवडणूक होणार असून ही निवडणूक लढण्याची या १७ आमदारांची इच्छा आहे.

| September 24, 2019 03:32 am

(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : कर्नाटकमधील अपात्र घोषित करण्यात आलेल्या १७ आमदारांच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले. कर्नाटक विधानसभेच्या १५ जागांसाठी पोटनिवडणूक होणार असून ही निवडणूक लढण्याची या १७ आमदारांची इच्छा आहे.

न्या. एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या पीठाने या याचिकेवर २५ सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. पोटनिवडणूक लढण्यासाठी अंतरिम दिलासा देण्याची मागणी अपात्र आमदारांनी केली आहे.

या अपात्र आमदारांच्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी अपात्रतेच्या आदेशात म्हटले आहे की, या आमदारांना उर्वरित मुदतीसाठी निवडणूक लढता येऊ शकणार नाही.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या वकिलांनी पीठासमोर सांगितले की, १५ रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असल्याने न्यायालयास निवडणुकीला स्थगिती देता येणार नाही.

विधानसभा अध्यक्षांनी या आमदारांना अपात्र घोषित केले असले तरी त्यांना पोटनिवडणूक लढण्याच्या त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवता येऊ शकत नाही, असे आयोगाच्या वकिलांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 3:32 am

Web Title: supreme court to hear plea of disqualified karnataka mlas zws 70
Next Stories
1 पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी चर्चेची नव्हे कृतीची गरज : पंतप्रधान नरेंद्र मोदी
2 जम्मू-काश्मीर : हिज्बुल मुजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्यांना अटक
3 छोटीशी चूकही पाकिस्तानला महाग पडेल! लष्कराकडे उत्तर देण्याचा ‘प्लान’ तयार
Just Now!
X