निर्भया प्रकरणातील आरोपी विनय कुमार शर्मा याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. मानसिक स्थिती बिघडल्याची याचिका विनय शर्माने केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ती फेटाळून लावत विनय शर्मा हा मानसिक दृष्ट्या सक्षम असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. तसंच तो शारीरिकदृष्ट्याही सुदृढ आहे असंही कोर्टाने म्हटलं आहे.

निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यानंतर विनय कुमार शर्मा या आरोपीने राष्ट्रपतींकडेही दयेचा अर्ज केला होता. मात्र तो देखील फेटाळण्यात आला आहे. निर्भयाच्या दोषींना १ फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार होती. मात्र ती तारीख पुढे ढकलण्यात आली. अद्यापही नवं डेथ वॉरंट जारी करण्यात आलेलं नाही. निर्भयाच्या दोषींना फाशी दिली जात नाही तोपर्यंत लढा सुरुच ठेवणार असल्याचं निर्भयाच्या आईने म्हटलं आहे.