जम्मू-काश्मिरच्या कटुआ येथे शुक्रवारी दहशवाद्यांशी लढताना साताऱ्यात राहणारा सूरज मोहिते हा तरूण शहीद झाला. सूरज हा २२ वर्षांचा असून, तो सीआरपीएफच्या तुकडीत सामील होता. सीआरपीएफच्या १२१व्या बटालियनमधील ई कंपनीत कॉन्स्टेबलच्या हुद्द्यावर सूरज मोहिते कार्यरत होता. कटूआ जिल्ह्यातील राजबाग पोलिस ठाण्यावर शुक्रवारी सकाळी ६.२०च्या सुमारास दहशतवाद्यांच्या आत्मघातकी पथकाने चढविलेल्या या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सूरज मोहिते  यांच्यासह स्थानिक पोलीस कर्मचारी आणि एका नागरिकाचा समावेश आहे.  
शुक्रवारी सकाळी तीन ते चार दहशतवाद्यांचे टोळके राजबाग पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरील पहारेकऱ्यांवर गोळीबार करीत आतमध्ये शिरले. त्यानंतर या ठिकाणी दाखल झालेले सीआरपीएफचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू होती. दुपारपर्यंत या ठिकाणचा गोळीबार थांबला असला तरी पोलीस ठाण्याच्या आतमध्ये अजूनही काही दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आतापर्यंत दोन दहशतवाद्यांना मारण्यात यश आल्याचे सांगण्यात येत असले तरी लष्कराकडून याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

जम्मूच्या कटुआमध्ये दहशतवादी हल्ला, सुरक्षा दलाचा जवान शहीद

Pune, firing, Firing on youth,
पुणे : शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार
Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार
NIA team attacked in Bengal
पश्चिम बंगालमधील ‘एनआयए’च्या पथकावरील हल्ला प्रकरणात ट्विस्ट; अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला