07 March 2021

News Flash

सुरतमध्ये चौकाचौकात हाफिज सय्यद, लादेनबरोबर केजरीवाल यांचेही छायाचित्र

पाकिस्तानचे हिरो म्हणून बुरहान वानी, हाफिज सय्यद,लादेन यांचे पोस्टर लावले आहेत.

सूरत शहरात जागोजागी पाकिस्तानचे हिरो म्हणून बुरहान वाणी, हाफिज सय्यद आणि ओसामा बिन लादेन यांचे पोस्टर लावले आहेत. परंतु या पोस्टरमध्ये अरविंद केजरीवाल यांचेही छायाचित्र आहे. छायाचित्र: हानिफ मालेक

आम आदमी पक्षाचे नेते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सुरत दौऱ्याच्या दोन दिवस आधी नव्या वादाला तोंड फुटले आहे. सुरत शहरात जागोजागी पाकिस्तानचे हिरो म्हणून बुरहान वानी, हाफिज सय्यद आणि ओसामा बिन लादेन यांचे पोस्टर लावले आहेत. परंतु या पोस्टरमध्ये अरविंद केजरीवाल यांचेही छायाचित्र आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्या दौऱ्यापूर्वी ‘आप’ला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे बोलले जाते. भाजपनेच केजरीवाल यांचे आक्षेपार्ह पोस्टर लावल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे.
रविवारी (दि. १६) केजरीवाल हे सुरतमध्ये सभा घेणार आहेत. त्याचबरोबर ते अहमदाबाद येथे जाणार आहेत. या दौऱ्यात ते विविध संघटनांना भेटीही देणार आहेत. दरम्यान विविध ठिकाणी लावलेले हे आक्षेपार्ह पोस्टर आपकडून काढण्यात येत आहेत.
सूरतमधील विविध भागातील असे आठ पोस्टर काढल्याचे ‘आप’चे प्रवक्ते योगेश जादवानी यांनी सांगितले. केजरीवाल यांची सभा उधळवून लावण्यासाठी भारतीय जनता पक्षाने हे पोस्टर लावल्याचा आरोप त्यांनी केला. केजरीवाल यांच्या सभेला एक लाखाहून अधिक लोक उपस्थित राहतील असा दावाही त्यांनी केला. केजरीवाल यांच्याबरोबर कुमार विश्वास आणि संजय सिंग हेही या सभेत सहभागी होणार आहेत.
दुसरीकडे भाजपने आपचा आरोप फेटाळला आहे. केजरीवाल यांचा विरोध न करण्याचे आदेश पक्षाने कार्यकर्त्यांना दिल्याचे सूरतचे शहराध्यक्ष नितीन भाजियावाला यांनी सांगितले. कार्यकर्ते निश्चितच पक्षाचा आदेश मानतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांच्या पोस्टरला काळे फासण्यात आले होते. त्यावेळीही भाजपवरच आरोप करण्यात आला होता. परंतु चौकशीत हे कृत्य ‘आप’चा कार्यकर्ता अजित तिवारी याने केल्याचे समोर आले होते. प्रसिद्धीसाठी ‘आप’चे नेते असे तंत्र वापरून भाजपची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका भाजपच्या नेत्यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 9:07 am

Web Title: surat rally ahead of arvind kejriwals visit banners feature him with osama bin laden hafiz saeed
Next Stories
1 यूएस ओपन :  मायदेशाची भीती आणि भारतीय टक्का
2 आयफोन ७ केवळ १९,९९० रूपयांत; जाणून घ्या काय आहे सत्य?
3 दंतकथा: जुनी अन् नवीही
Just Now!
X