News Flash

सुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर

सुरत प्रकरणातली बलात्कार पीडिता आणि तिच्या आईला ३५ हजारात विकण्यात आले होते अशी माहिती समोर आली आहे.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

कठुआ आणि उन्नाव या ठिकाणी झालेल्या बलात्काराच्या प्रकरणानंतर गुजरातमधील सुरत या ठिकाणी झालेल्या बलात्कारानेही देश हादरला. अशात आता सुरत प्रकरणातली बलात्कार पीडिता आणि तिच्या आईला ३५ हजारात विकण्यात आले होते अशी माहिती समोर आली आहे. अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी हा दावा केला की राजस्थान येथून या प्रकरणातल्या आरोपीला अटक केल्यानंतर याप्रकरणाची उकल झाली आहे. या नराधमाच्या चौकशीत त्याने ११ वर्षांची पीडित मुलगी आणि तिची विधवा आई यांना ३५ हजारात विकत घेतले होते ही माहिती समोर आली आहे.

मोल मजुरी करण्यासाठी या दोघींना ३५ हजारात विकत घेण्यात आले होते असे या आरोपीने पोलिसांना सांगितले. ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. तिच्या मृतदेहावर ८७ जखमा होत्या आणि तिच्या गुप्तांगावरही अनेक जखमा होत्या. ६ एप्रिल रोजी तिचा मृतदेह सापडला होता. ९ एप्रिलला ज्या ठिकाणी या मुलीचा मृतदेह सापडला त्याच ठिकाणापासून थोड्या अंतरावर एका महिलेचाही मृतदेह सापडला होता.

या बलात्कार आणि हत्या प्रकरणात गुन्हे शाखेने हरसाई गुर्जर या ३५ वर्षीय नराधमाला अटक केली. राजस्थानच्या माधोपूर जिल्ह्यात असलेल्या गंगापूर मधून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याशिवाय हरसाईचे भाऊ हरि सिंह, नरेश आणि अमर सिंह गुर्जर यांनाही ताब्यात घेण्यात आले असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरसाई आणि हरि सिंह हे दोघेही सुरत येथील एका मार्बल युनिटमध्ये लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत.

१५ मार्चला हरसाईने ११ वर्षांची पीडिता आणि तिच्या विधवा आईला एका माणसाकडून ३५ हजारांचा मोबदला देऊन खरेदी केले होते. त्यानंतर हरसाईने या दोघींना सुरतला आणले आणि त्यांच्यावर वारंवार बलात्कार केला. पीडित महिलेने या सगळ्याला विरोध दर्शवला तेव्हाच हरसाईने दोघींची हत्या करायचे ठरवले. २० मार्चला महिला बेपत्ता झाली. त्यानंतर हरसाईने पीडित मुलीला एका खोलीत डांबून ठेवले होते. त्याने अनेक दिवस तिच्यासोबत बलात्कार केला. ५ एप्रिलला तिची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आणि तिचा मृतदेह फेकून दिला.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पीडित मुलीला कारने घेऊन जात असल्याचे पोलिसांना समजले. त्यावरूनच हरसाईचा शोध लावण्यास मदत झाली. आता या प्रकरणातल्या नराधमांना कठोरातले कठोर शासन झालेच पाहिजे अशी मागणी केली जाते आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 11:20 am

Web Title: surat rape case victim mom were sold for rs 35000
Next Stories
1 ‘सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही’
2 आता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज!
3 कुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी
Just Now!
X