सूरत पोलिसांनी ५० आणि २०० रूपयांच्या नव्या नोटांचा काळा बाजार करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४७ लाखांच्या २०० रूपयांच्या नोटा आणि १९ लाखांच्या ५० रूपयांच्या नोटा या दोघांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. ७० लाख रूपयांच्या १० आणि २० रूपयांच्या नोटाही या दोघांकडे सापडल्या आहेत. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

आरबीआयने २५ ऑगस्ट रोजी २०० रूपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या. तसेच ५० आणि १० रूपयांच्या नव्या नोटाही चलनात आणल्या. मात्र पुरेशा प्रमाणात या नोटा बाजारात उपलब्ध झालेल्या नाहीत. अशात या दोघांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात या नोटा कशा आल्या? याचा शोध आता पोलीस घेत आहेत. याआधी नोटाबंदीचा निर्णय झाल्यावरही देशातील विविध भागातून २ हजारांच्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. आता अटक करण्यात आलेल्या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.