भारताने दहशतवाद्यांविरोधात पाकिस्तानात केलेल्या एअर स्ट्राइकची देशभरात चर्चा सुरू आहे. लोक भारतीय वायूसेनेच्या या कारवाईचे कौतुक करत आहेत. भारतीय लष्कराने आपल्या ट्विटर हँडलवर एक कविता पोस्ट केली आहे. या कवितेत सैन्याचे शौर्य, देशाच्या सीमेचे संरक्षण आणि सैनिकांच्या दक्षतेबाबत सांगण्यात आले आहे.

भारतीय लष्कराने म्हटले आहे की, ‘माथे तिलक लगाती हमको, वीर प्रसूता मातायें; वीर शिवा, राणा, सुभाष की, भरी पड़ी हैं गाथायें। सरहद है महफूज हमारी, अपने वीर जवानों से; लिखते है इतिहास नया नित, जो अपने बलिदानों से।।’

दरम्यान, यापूर्वी मंगळवारी भारतीय वायूसेनेने दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईनंतरही लष्कराने एक कविता पोस्ट केली होती. एअर स्ट्राइकनंतर लष्कराने लिहिले होते की, ‘आज सिन्धु ने विष उगला है; लहरों का यौवन मचला है। आज ह्रदय में और सिन्धु में, साथ उठा है ज्वार; तूफानों की ओर घुमा दो, नाविक निज पतवार।’

भारतीय वायूसेनेने मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एलओसीपार जाऊन पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. १२ मिराज २००० फायटर जेटने ही कारवाई करण्यात आली होती. या विमानातून दहशतवादी तळांवर १००० किलोचे बॉम्ब टाकण्यात आले होते. या एअर स्ट्राइकमध्ये २०० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता.