02 March 2021

News Flash

Surgical Strike 2: शोभा डे म्हणतात…

'माझ्या सैन्याशी पंगा घेऊ नका, अन्यथा ते शरणागती स्वीकारतील असे इम्रान खान यांनी म्हटले असेल'

संग्रहित छायाचित्र

पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्याचा भारताच्या हवाई दलाने बारा दिवसांमध्ये बदला घेतला. हवाई दलाच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून स्ट्राइक केले असून यात सुमारे ३५० दहशतवादी मारले गेले. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी भारतीय सैन्याचे अभिनंदन केले आहे. अपना टाइम आ गया, असे शोभा डे यांनी म्हटले आहे.

पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पुलवामा येथील हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी केली जात होती. अखेर मंगळवारी सकाळी हवाई दलाने पाकच्या हद्दीत दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केला आणि देशभरात भारतीय सैन्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला.

प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी ट्विट केले आहे. त्या म्हणाल्या, अपना टाइम आ गया. शोभा डे यांनी आणखी एका ट्विटमध्ये इम्रान खान यांची खिल्ली उडवली आहे. ‘माझ्या सैन्याशी पंगा घेऊ नका, अन्यथा ते शरणागती स्वीकारतील’, असे इम्रान खान म्हणत असल्याचे शोभा डे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम या राजकीय पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, एखाद्या आत्मसन्मान असलेल्या देशाने जे करायला हवे ते आपण केले आहे, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2019 6:05 pm

Web Title: surgical strike 2 shobhaa de reaction salutes air force
Next Stories
1 पाकने आपल्या हद्दीतील दहशतवादी गटांवर तत्काळ कारवाई करावी : ऑस्ट्रेलिया
2 भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर आनंद महिंद्रांनी केलेले ‘हे’ ट्विट झाले व्हायरल
3 Surgical Strike 2: बालाकोटचा प्रवास, शीखविरोधी जिहादी चळवळ ते दहशतवाद्यांचे तळ
Just Now!
X