सूर्यनेल्ली बलात्कारप्रकरणी बुधवारी न्यायालयाने राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांना नोटीस बजावली. सूर्यनेल्ली बलात्कार प्रकरणी या घटनेतील पीडितेने फेरविचार याचिका न्यायालयाकडे दाखल केली आहे. ती न्यायालयाने दाखल करून घेतली आणि कुरियन यांना नोटीस बजावली.
थोडूपूझा सत्र न्यायालयाचे न्या. अब्राहम मॅथ्यू यांच्या न्यायालयात याविषयी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने याप्रकरणातील प्रमुख आरोपी धर्मराजन याच्यासह इतर दोन आरोपी जमाल आणि उन्नीकृष्णन यांनाही नोटीस बजावली आहे. याचिकेवरील पुढील सुनावणी २९ मे रोजी होईल. पुढील सुनावणीच्यावेळी धर्मराजनला न्यायालयात हजर करावे, असाही आदेश देण्यात आला.
कुरियन यांचा बलात्कार प्रकरणात असलेल्या सहभागाचा तपास करावा, यासाठी पीडितेने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱयांकडे केलेली याचिका फेटाळण्यात आली होती. त्यानंतर सत्र न्यायालयाकडे फेरविचार याचिका दाखल करण्यात आली.