16 December 2017

News Flash

सूर्यनेल्ली बलात्कार प्रकरणात कुरियन यांचा सहभाग: आरोपी धर्मराजन याचा आरोप

सूर्यनेल्ली बलात्कार प्रकरणात राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांचा सहभाग होता, असा खळबळजनक

कोची | Updated: February 11, 2013 6:04 AM

 सूर्यनेल्ली बलात्कार प्रकरणात राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांचा सहभाग होता, असा खळबळजनक आरोप या प्रकरणातील एक आरोपी धर्मराजन यांनी सोमवारी एका वृत्तपत्राकडे केला.
मैसूरमधील अज्ञातस्थळावरून मातृभूमी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत धर्मराजन याने म्हटले आहे, १९ जानेवारीला कुरियन वंदिपेरियारमधून आपल्या अम्बेसिडर कारमधून साडेसहाच्या सुमारास कुमिली अतिथी निवासस्थानामध्ये गेले होते. त्यांच्यासोबत उन्नी आणि जमाल हे दोघेही होते. सुमारे अर्धा तास ते संबंधित मुलीबरोबर अतिथी निवासस्थानी होते. या प्रकरणातील तपास अधिकारी सिबी मॅथ्यूज खोटे बोलत असल्याचा आरोपही धर्मराजन याने केला.
दरम्यान, कुरियन यांना उपाध्यक्षपदावरून हटवावे, या मागणीसाठी केरळमधील विधिमंडळाच्या इमारतीबाहेर निदर्शकांनी जोरदार निदर्शने केली. निदर्शकांना रोखण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

First Published on February 11, 2013 6:04 am

Web Title: suryanelli rape accused dharmarajan claims p j kurien involved