न्यायालयाने रविवारी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा नोकर दीपेश सावंतला ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) शनिवारी दीपेशला अटक केली. ईडीने प्राप्त केलेल्या मोबाइल चॅटनुसार अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि अन्य आरोपींसोबत दीपेशही अमली पदार्थांच्या खरेदी-विक्री व्यवहारांबाबत चर्चा करत होता. रियाचा भाऊ शोविकच्या सांगण्यावरून दीपेशने अमली पदार्थ विकत घेतल्याची माहिती एनसीबीला मिळाली.

दंडाधिकारी न्यायालयाने शनिवारी शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दुसरीकडे एनसीबीने रियाचा समन्स बजावले असून रविवारी सकाळी रिया चौकशीसाठी एनसीबीसमोर हजर राहिली. सुशांतच्या मृत्यूशी अमली पदार्थांचा संबंध तपासण्यासाठी एनसीबी शोविक, रिया, सुशांतचा नोकर दीपेश सावंत आणि अन्य दोन आरोपींची समोरासमोर चौकशी करणार आहे.

Indian Railway completes 171 years Boribandar to Thane local ran on 16 April 1853
भारतीय रेल्वेला १७१ वर्षे पूर्ण! १६ एप्रिल १८५३ रोजी धावली बोरीबंदर ते ठाणे लोकल
nagpur shivshahi bus accident marathi news
नागपूर : भरधाव शिवशाही बसने वाटसरूला उडवले
mumbai chembur to jacob circle monorail marathi news
स्वदेशी बनावटीच्या मोनोचे तीन डबे मुंबईत, उर्वरित नऊ मोनोरेल डिसेंबरपर्यंत ताफ्यात दाखल
Pune Airport s New Terminal still not open for public
अजित पवारांनी आधी सांगूनही पुणेकरांचे अखेर ‘एप्रिल फूल’! जाणून घ्या नेमके प्रकरण…

अमली पदार्थविरोधी पथकातील (एनसीबी) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शोविक अमली पदार्थांची खरेदी-विक्री आणि वाहतुकीबाबत अनेक व्यक्तींच्या संपर्कात होता, हे आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. चौकशीदरम्यान त्याने स्वत:हून काही व्यक्तींची नावे उघड केली, तर त्याचे व्हॉट्सअॅप चॅट, दूरध्वनी तपशील आणि आर्थिक व्यवहारांवरून अन्य व्यक्ती समोर आल्या आहेत. या प्रत्येक व्यक्तीकडे चौकशी करून शोविकसोबतचे व्यवहार, संबंध तपासले जाणार आहेत.

सुशांतच्या निवासस्थानी तपास

शनिवारी पुन्हा केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष पथकाने वांद्रे येथील ‘मॉन्ट ब्लँक’ इमारतीतील सुशांतच्या निवासस्थानाला भेट दिली. मिळालेल्या माहितीनुसार, या पथकाने १४ जूनला घडलेल्या घटनांशी निगडीत तपास केला. या वेळी सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, आचारी नीरज सिंह, केशव बचनेर उपस्थित होते. १४ जूनला सुशांत मृतावस्थेत आढळला तेव्हा हे तिघे निवासस्थानी होते.