23 January 2021

News Flash

भाजपा नेते सुशीलकुमार मोदींचं ‘ते’ ट्विट ट्विटरने केलं डिलीट

ट्विट डिलीट करण्याचं कारण?

भाजपाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी केलेलं ट्विट ट्विटरकडून डिलीट करण्यात आलं आहे. सुशील कुमार मोदी यांनी सध्या तुरूंगात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता पक्षाचे नेते लालू प्रसाद यादव यांच्यावर गंभीर आरोप करणारं ट्विट केलं होतं. मोदी यांचं ट्विट ट्विटरच्या आचारसंहितेचा भंग करणारं असल्यानं ट्विटरकडून ते डिलीट करण्यात आलं आहे.

माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी लालू प्रसाद यादव तुरूंगातून सरकार पाडण्याचा कट रचत असल्याचा आरोप केला होता. ते तुरूंगातून एनडीएच्या आमदारांना फोन करून मंत्रीपद देण्याचं आश्वासन देत असल्याचंही मोदी यांनी म्हटलं होतं. एनडीएच्या आमदारांना कॉल आलेल्या नंबरवर आपण कॉल केला, तेव्हा लालू प्रसाद यादव यांनीच फोन उचलला. असं करून नका, यात तुम्ही यशस्वी होणार नाही, असं आपण त्यांना म्हणाल्याचं मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

ट्विट डिलीट करण्याचं कारण

सुशील कुमार मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर आरोप करताना कॉलचा उल्लेख केला होता. त्यातच त्यांनी तो मोबाईल नंबरही ट्विटमध्ये दिला होता. ट्विटमध्ये मोबाईल नंबर देणं ट्विटरच्या आचारसंहितेचा भंग असून, त्या कारणामुळे ट्विटरने हे ट्विट डिलीट केलं आहे.

 

कॉल प्रकरणाची चौकशी सुरू

लालू प्रसाद यादव यांना झारखंडमधील रांचीच्या तुरूंगात ठेवण्यात आलेलं आहे. तेथूनच त्यांनी कॉल केल्याचा दावा मोदी यांनी केला होता. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. झारखंडचे तुरुंग महानिरीक्षक वीरेंद्र भूषण यांनी लालू प्रसाद यादव यांनी भाजपा आमदार ललन पासवान यांना कॉल केल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर योग्य कारवाई करण्यात येईल, अशी माहिती भूषण यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2020 12:43 pm

Web Title: sushil kumar modi tweet lalu prasad yadav twitter delet tweet bmh 90
Next Stories
1 शेतकऱ्यांचं आंदोलन पुन्हा पेटलं; दिल्ली पोलिसांकडून पाण्याचे फवारे, अश्रुधुरांचा वापर
2 ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या भारतीय इंजिनिअर्सना ‘रिमोट वर्क’साठी जगभरातून मोठ्या ऑफर्स
3 लज्जास्पद! ६२ वर्षीय पुजाऱ्यानं १० वर्षांच्या चिमुकलीवर केला बलात्कार
Just Now!
X