17 December 2017

News Flash

हैदराबाद स्फोट: सुशीलकुमार शिंदे यांची घटनास्थळाला भेट

दिलसुखनगरमध्ये गुरुवारी संध्याकाळी झालेल्या दोन बॉम्बस्फोटांनंतर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळाला

हैदराबाद | Updated: February 22, 2013 10:42 AM

दिलसुखनगरमध्ये गुरुवारी संध्याकाळी झालेल्या दोन बॉम्बस्फोटांनंतर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळाला भेट दिली. शिंदे विशेष विमानाने शुक्रवारी सकाळी हैदराबादल पोचले. विमानतळावरून ते थेट दिलसुखनगरमध्ये गेले. तिथे त्यांनी बॉम्बस्फोट झालेल्या घटनास्थळाची पाहणी केली आणि पोलिसांबरोबर चर्चा केली. 
शिंदे म्हणाले, स्फोटांचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने विशेष पथक नेमले आहे. हैदराबादमध्येच स्फोट होईल, अशी नेमकी माहिती गुप्तचर यंत्रणांकडे नव्हती. केवळ देशातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये दहशतवादी कारवाई होऊ शकते, एवढीच माहिती केंद्र सरकारकडे होती. स्फोटामध्ये कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे, याबद्दल आताच काहीही सांगता येणार नाही.
शिंदे यांच्याबरोबर आंध्र प्रदेशचे राज्यपाल ई. एस. नरसिंह, मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी, केंद्रीय गृहसचिव एन. के. सिंह हेदेखील होते. दिलसुखनगरमधील एका फास्टफूड सेंटरजवळ झालेल्या स्फोटात आतापर्यंत ८ जण मृत्युमुखी पडले होते. राष्ट्रीय तपास संस्थेच्या अधिकाऱयांबरोबरही शिंदे यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी जखमींवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयांमध्ये जाऊन विचारपूस केली.

First Published on February 22, 2013 10:42 am

Web Title: sushil kumar shinde visits hydearbad twin blast site