20 November 2017

News Flash

चार फेब्रुवारीला ठरले अफजल गुरुला आज फाशी देण्याचे

अफजल गुरुची दयेची याचिका फेटाळल्याची फाईल राष्ट्रपतींकडून माझ्याकडे ३ फेब्रुवारीला आली. फाशीची अमलबजावणी करावी,

नवी दिल्ली | Updated: February 9, 2013 10:27 AM

अफजल गुरुची दयेची याचिका फेटाळल्याची फाईल राष्ट्रपतींकडून माझ्याकडे ३ फेब्रुवारीला आली. फाशीची अमलबजावणी करावी, या आदेशावर मी चार फेब्रुवारीला स्वाक्षरी केली, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले. 
शिंदे म्हणाले, गृहमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर दयेच्या अर्जासंबंधीच्या फाईलवर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे मी सांगितले होते. त्याप्रमाणे अफजल गुरुची फाईल माझ्या शिफारशींसह राष्ट्रपतींकडे २३ जानेवारीला पाठविली होती. राष्ट्रपतींकडून दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर लगेचच फाशीची अमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

First Published on February 9, 2013 10:27 am

Web Title: sushilkumar shinde says we took decision of afzal gurus hanging on 4 february