News Flash

सुषमा स्वराज यांनी चीनसमोर गुडघे टेकले: राहुल गांधी

सुषमा स्वराज यांनी चीनसमोर गुडघे टेकले. सरकारने अशा पद्धतीने चीनसमोर लोटांगण घातल्याने सीमेवर तैनात असलेल्या जवानांचाही विश्वासघात केला

राहुल गांधी (संग्रहित छायाचित्र)

भारत आणि चीनमधील डोकलाम वादावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुषमा स्वराज यांच्यावर टीका केली. सुषमा स्वराज यांनी चीनसमोर गुडघे टेकले असून हा भारताच्या शूरवीर जवानांचा विश्वासघात आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

डोकलाम वादावरुन सुषमा स्वराज यांनी बुधवारी लोकसभेत माहिती दिली होती. ‘डोकलामचा वाद राजकीय परिपक्वतेने मिटवण्यात आला असून देशाने एक इंचदेखील जमीन गमावलेली नाही, जैसे थे परिस्थिती कायम राखली गेली आहे, असे त्यांनी सांगितले होते. सुषमा स्वराज यांनी हे संसदेत स्पष्टीकरण दिले असतानाच दुसरीकडे अमेरिकेने डोकलामसंदर्भात महत्त्वपूर्ण विधान केले होते.

भारत आणि चीनने माघार घेतले असली तरी चीन छुप्या पद्धतीने डोकलाममध्ये सक्रीय होत आहे, असे अमेरिकेने म्हटले होते. याचा दाखला देत राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन सुषमा स्वराज यांच्यावर टीका केली. ‘सुषमा स्वराज यांनी चीनसमोर गुडघे टेकले. सरकारने अशा पद्धतीने चीनसमोर लोटांगण घातल्याने सीमेवर तैनात असलेल्या जवानांचाही विश्वासघात केला, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, बुधवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात वुहान येथे अनौपचारिक बैठक का घेण्यात आली, या बैठकीत अजेंडा का ठरवण्यात आला नाही, असा प्रश्न तृणमूल काँग्रेसचे खासदार सुगाता बोस यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना स्वराज म्हणाल्या की, दोन्ही देशांत विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे याच उद्देशाने ही बैठक आयोजित केली होती. बैठक कोणत्याही एका विषयापुरती सीमित न ठेवता महत्त्वाच्या विषयांवर मोकळेपणाने चर्चा होणे अपेक्षित होते. त्यामुळे बैठकीचा अजेंडा ठरवण्यात आला नाही, असे त्यांनी म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 12:28 pm

Web Title: sushma swaraj buckled and prostrated herself in front of chinese power says rahul gandhi
Next Stories
1 हलालापासून वाचायचे असेल तर मुस्लिम मुलींनी हिंदू मुलांशी लग्न करावे-साध्वी प्राची
2 खळबळजनक ! घराच्या मागे पुरलेल्या अवस्थेत आढळले एकाच कुटूंबातील ४ मृतदेह
3 Assam NRC : सरकारी सेवेतील लष्करी अधिकारी, पोलीस आणि शिक्षकही ठरले घुसखोर?
Just Now!
X