हिंदी सिनेसृष्टीत काही निवडक कलाकार आहेत ज्यांना फक्त देशात नाही तर देशाबाहेरही अपार प्रेम मिळाले. अशा कलाकारांमध्ये समावेश होतो तो राज कपूर यांचा. राज कपूर यांची क्रेझ आजही किती आहे याचा अनुभव परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी घेतला. सुषमा स्वराज या कझाकिस्तान, किर्गिस्तान आणि उझबेकीस्तानच्या दौऱ्यावर आहेत. यापैकी उझबेकीस्तानमध्ये जेव्हा त्या गेल्या होत्या तेव्हा एका उझबेकी महिलेने इचक दाना बिचक दाना हे गाणे म्हटले. सुषमा स्वराज यांना हे गाणे ऐकून आनंद झाला. या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तसेच परराष्ट्र मंत्रालयाने हा व्हिडिओही ट्विट केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे.

हिंदी सिनेसृष्टीला सीमांचे बंधन नाही उझबेकिस्तानमध्ये राज कपूर आणि नर्गिस हे नाव सर्वश्रुत आहे. उझबेकी महिलेला सलाम अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. उझबेकी महिलेने गायलेले इचक दाना बिचक दाना हे गाणे राज कपूर आणि नर्गिस अभिनित श्री ४२० या सिनेमातले आहे. सुषमा स्वराज यांच्यासोबतच्या या उझबेकी महिलेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे.

पाहा व्हिडिओ

मूळ गाणे श्री ४२० सिनेमातले आहे तुम्ही ऐकले नसेल तर त्या गाण्याचा व्हिडिओ