कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर टीका केली. सुषमा स्वराज ड्रामेबाज असून, नाटक करण्यात त्या पटाईत असल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.
ललित मोदी यांना मदत केल्याप्रकरणात सुषमा स्वराज यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप गुरुवारी फेटाळून लावले. ललित मोदी यांना मदत केल्याचा एकतरी पुरावा विरोधकांनी आणून द्यावा, असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना सोनिया गांधी यांनी सुषमा स्वराज यांच्यावर निशाणा साधला. नाटक करण्यात सुषमा स्वराज पटाईत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर या प्रकरणावरून सुषमा स्वराज नाटक करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी सांगितले.