30 September 2020

News Flash

..म्हणून पाकवर एअर स्ट्राइक; सुषमा स्वराज यांनी चीनसमोर मांडली भूमिका

पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण जग पाकिस्तानला जैश ए मोहम्मद आणि इतर दहशतवादी संघटनांनाविरोधात कारवाई करण्यास सांगत होते.

पाकिस्तानी दहशतवादी तळांवर भारतीय वायूसेनेने एअर स्ट्राइक केल्याच्या दुसऱ्या दिवशी (बुधवार) परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज चीन दौऱ्यावर गेल्या आहेत. (छायाचित्र: एएनआय)

पाकिस्तानी दहशतवादी तळांवर भारतीय वायूसेनेने एअर स्ट्राइक केल्याच्या दुसऱ्या दिवशी (बुधवार) परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज चीन दौऱ्यावर गेल्या आहेत. रशिया, भारत आणि चीन (आरआयसी) या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत त्या सहभागी झाल्या आहेत. या बैठकीत त्यांनी पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद्याचा मुद्दा उपस्थित केला. चीन आणि रशियासमोर भारताने एअर स्ट्राइक करण्यामागचे कारण स्पष्ट केले.

चीनमधील वुझेन शहरात १६ व्या आरआयसी परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. स्वराज म्हणाल्या, पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण जग पाकिस्तानला जैश ए मोहम्मद आणि तिथे सक्रिय असलेल्या इतर दहशतवादी संघटनांनाविरोधात कारवाई करण्यास सांगत होते. जैश ए मोहम्मदने तर हल्ल्याीच जबाबदारीही घेतली होती. या हल्ल्यात भारताचे ४० धाडसी सीआरपीएफ जवानांना आपला जीव गमवावा लागला. तरीही पाकिस्तानने ‘जैश’ विरोधात कोणतेच पाऊल उचलले नाही.

दहशतवादी भारतात आणखी हल्ला करण्याचा कट रचत होते. त्यामुळे ही कारवाई करणे गरजेचे होते. कारवाई करताना भारताने योग्य ती काळजी घेतली होती. या कारवाईदरम्यान निश्चित केलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवरच लक्ष्य साधला. हे कोणतेही लष्करी ऑपरेशन नव्हते आणि कोणत्याही लष्करी ठिकाणांना निशाणा बनवण्यात आले नाही. ही कारवाई संपूर्णपणे दहशतवाद्यांविरोधात होती, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भारत अत्यंत जबाबदारीने आणि संयमाने काम करेल अस भरवसाही आंतरराष्ट्रीय समुदायाला दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2019 10:36 am

Web Title: sushma swaraj russia india china ric foreign ministers meeting iaf air strike balakot pakistan pulwama attack
Next Stories
1 पाकवरील एअर स्ट्राइकचे पडद्यामागील सूत्रधार बीरेंद्र सिंग धनोआ आहेत तरी कोण ?
2 Surgical Strike 2: ‘या’ सात जणांनाच होती पाकिस्तानवरील हवाई हल्ल्याची कल्पना
3 ‘लष्कराला आधीच फ्री हॅण्ड दिला असता तर झाले नसते पुलवामासारखे हल्ले’
Just Now!
X