News Flash

‘भारतव्याप्त काश्मिर’ अशी कोणतीही जागा नाही , सुषमा स्वराज यांनी मदत मागणाऱ्याला फटकारलं

मदत मागणाऱ्याला दिलेल्या भन्नाट उत्तरामुळे पुन्हा एकदा सुषमा स्वराज यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

‘भारतव्याप्त काश्मिर’ अशी कोणतीही जागा नाही , सुषमा स्वराज यांनी मदत मागणाऱ्याला फटकारलं

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या ट्विटरवर नेहमीच सक्रिय असतात आणि लोकांची मदत करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे अनेकदा त्यांचं कौतुकही झालंय. पण आता मदत मागणाऱ्याला दिलेल्या भन्नाट उत्तरामुळे पुन्हा एकदा सुषमा स्वराज यांच्यावर सोशल मीडियामध्ये कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ट्विटरवर शेख अतीक नावाच्या एका युजरने सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली. ट्विटमध्ये त्याने , ‘सुषमा जी मला तुमच्या मदतीची गरज आहे…मला भारतात माझ्या घरी परतायचंय, पण माझा पासपोर्ट खराब झालाय, मी विद्यार्थी असल्याने जास्त खर्च करु शकत नाही तसंच माझी प्रकृतीही ठिक नाहीये. तुम्ही काही करु शकतात का ?’असं म्हटलं.

त्याच्या ट्विटला उत्तर देताना सुषमा यांनी ट्विट केलं, ‘जर तुम्ही जम्मू-काश्मीरचे असतात तर मी नक्कीच तुमची मदत केली असती. मात्र तुमच्या प्रोफाईलनुसार तुम्ही भारतव्याप्त काश्मीरमध्ये राहतात, पण अशी कोणती जागाच नाहीये’.

सुषमांकडून आलेल्या उत्तरानंतर मदत मागणाऱ्या विद्यार्थ्याने तातडीने स्वतःची प्रोफाईल बदलली आणि भारतव्याप्त काश्मिरऐवजी जम्मू-काश्मिर असं केलं. त्यानंतर त्याने पुन्हा ट्विट करुन, मी जम्मू-काश्मिरचा असून फिलिपाइन्समध्ये शिक्षणासाठी आलो आहे असं म्हटलं.

त्यानंतर प्रोफाईल बदलल्याबद्दल स्वराज यांनी आनंद व्यक्त केला आणि त्याच्या मदतीसाठी निर्देश दिले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2018 10:57 am

Web Title: sushma swaraj twitter jammu kashmir student help says therss no place like indian occupied kashmir
Next Stories
1 धक्कादायक ! गॅंगस्टरने बंदुकीचा धाक दाखवून केलं अल्पवयीन मुलीशी लग्न
2 पती-पत्नीच्या वादामुळे हायकोर्टाने केले मुलाचे ‘नामकरण’
3 ‘आझादी’ कधीच शक्य नाही, तुम्ही आमच्याशी लढू शकत नाही : लष्करप्रमुख बिपीन रावत