News Flash

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीने अंतर्वस्त्राने घेतला गळफास

आपल्या शेजारच्याला मारहाण केल्यामुळे एका ४५ वर्षीय सरकारी कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक करण्यात आली होती. पोलिसांना त्याचा मृतदेह स्वच्छतागृहात लटकत असताना दिसला.

(संग्रहित छायाचित्र)

कांचीपूरममधील चुनमबेडू पोलीस कोठडीत असलेल्या एका आरोपीने अंतर्वस्त्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आपल्या शेजारच्याला मारहाण केल्यामुळे एका ४५ वर्षीय सरकारी कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक करण्यात आली होती. सीतारासू असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांच्या मारहाणीत सीतारासूचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीतारासू हा शिक्षण विभागात कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत होता. त्याचे घर दक्षिण चेन्नईपासून ११५ किमी दूर चुनमबेडू येथे आहे. शेजाऱ्याच्यावर मारहाण केल्याचा आरोप त्याच्यावर होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. रात्री सुमारे चार तास वीज गेली होती. त्याचदरम्यान सीतारासू स्वच्छतागृहात गेला आणि तिथे स्वत:च्याच अंतर्वस्त्राने गळफास घेतला. सुमारे साडेचार वाजता वीज आली. तेव्हा पोलिसांना सीतारासूचा मृतदेह स्वच्छतागृहात लटकत असताना दिसला.

पोलिसांच्या मारहाणीत सीतारासूचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याची पत्नी वेन्नीलाने केला आहे. आपल्या पतीला बेदम मारहाण करण्यात आली आणि आत्महत्या दाखवण्यासाठी त्याचा मृतदेह लटकवण्यात आल्याचे ती म्हणाली. पोलिसांना सहकार्य करण्यासाठी सीतारासू स्वत: पोलिसांकडे गेल्याचे त्याचे काका प्रशांत यांनी सांगितले.

प्रशांत म्हणाले की, सीतारासू आणि त्याचा शेजारी जगन यांच्यात हाणामारी झाली होती. नंतर हे प्रकरण पोलिसांत गेले. पोलिसांनी एफआयआर लिहून घेण्यास नकार दिला. दरम्यान, घटनेची संवेदनशीलता पाहून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या दिवशी सीतारासूने आत्महत्या केली. त्या रात्री कामावर असलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यांच्याविरोधात फौजदारी कलमे लावण्यात आली असून न्यायालयीन चौकशीचे आदेशही दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 12:46 pm

Web Title: suspect committed suicide in police custody underwear chennai
Next Stories
1 जॉर्जियामध्ये अमेरिकी लष्कराचं विमान कोसळलं, ९ जणांचा मृत्यू झाल्याची भीती
2 पंतप्रधान पीक विमा योजनेत खासगी विमा कंपन्या मालामाल: राहुल गांधी
3 चीनची दादागिरी रोखण्यासाठी भारत, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया एकत्र येणार ?
Just Now!
X