News Flash

बांगलादेशी ब्लॉगरच्या हत्येची संशयिताकडून कबुली

मनन राही हा सहजलाल विद्यापीठातील शास्त्र आणि तंत्रज्ञान विभागाचा विद्यार्थी आहे.

बांगलादेशमधील धर्मनिरपेक्ष ब्लॉगर अनंता बिजय दास यांची हत्या केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या एका संशयित विद्यार्थ्यांने हत्येची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली असून या प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.
मनन राही हा सहजलाल विद्यापीठातील शास्त्र आणि तंत्रज्ञान विभागाचा विद्यार्थी आहे. त्याने सिल्हेट न्यायालयात हजर करण्याआधी कबुलीजबाब दिला. ब्लॉगर हत्या प्रकरणात सहभाग असल्याची राहीने कबुली दिल्याचे पोलीस अधिकारी अरमान अली यांनी सांगितले. दोन विद्यार्थ्यांसह पाच जणांनी मिळून ब्लॉगर दास यांची हत्या केल्याचा दावा सीआयडीने केला आहे. या प्रकरणाबाबत तपास सुरू असल्याने माहिती लगेच उघड करणे शक्य नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दास यांची १२ मे रोजी हत्या केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 3:06 am

Web Title: suspect confesses to murdering bangladeshi blogger
Next Stories
1 लडाख स्वायत्त विकास परिषदेच्या सर्व जागा भाजप लढविणार
2 स्वच्छ भारत मोहिमेच्या सचिवांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज
3 कलबुर्गी हत्येप्रकरणी रामा सेनेचा प्रमुख प्रसाद अट्टावर ताब्यात
Just Now!
X