04 August 2020

News Flash

केंद्रीय मंत्र्याच्या गाडीखाली पाइपबॉम्ब

केंद्रीय मंत्री व्ही. नारायणसामी यांच्या मोटारीखाली संशयास्पद स्फोटक वस्तू आढळल्याने बुधवारी खळबळ उडाली.

| January 30, 2014 12:22 pm

केंद्रीय मंत्री व्ही़ नारायणस्वामी यांच्या येथील निवासस्थानाबाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या कारच्या खाली पाइपबॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली आह़े  बॉम्ब शोधक- नाशक पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून अज्ञात व्यक्तीने पेरलेल्या या स्फोटकांची तपासणी सुरू केली आहे, असे पोलीस महासंचालक पी़ कामराज यांनी सांगितल़े तोटीसारख्या उपकरणाने दोन तारा जोडलेल्या आणि दोन्हीकडून बंदिस्त केलेल्या येथे आढळल्या आहेत़  परंतु, पुढच्या कारवाईसाठी बॉम्ब शोधक- नाशक पथकाच्या अहवालाची वाट पाहात असल्याचेही कामराज यांनी सांगितल़े  याबाबत स्फोटके कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
नारायणस्वामी सध्या दिल्लीत आहेत़  त्याच्या वाहन चालकाने पहाटेच्या वेळी गाडीखाली ही संशयास्पद वस्तू पाहिली़  केंद्रशासित प्रदेशात समाजकंटकांच्या कारवाया सुरू असल्याचे यावरून स्पष्ट होते, असे नारायणस्वामी याबाबत म्हणाल़े  दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी येथे निदर्शनेही केली़

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2014 12:22 pm

Web Title: suspected explosive device found under narayanasamys car
Next Stories
1 भारतींना आयोगासमोर बोलावल्याने सरकारकडून छळ
2 पक्षनिधीबाबत माहिती देण्यास ‘आप’ची टाळाटाळ
3 धार्मिक ऐक्य जपणे गरजेचे -सोनिया
Just Now!
X