19 September 2020

News Flash

उत्तर प्रदेशातून संशयीत ‘आयएयसआय’ एजंटला अटक

भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा 'आयएसआय'च्या एका संशयीत एजंटला उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’च्या एका संशयीत एजंटला उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. स्वॅट पथक आणि गु्न्हे शाखेच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे.


युपी पोलिसांच्या माहितीनुसार, जाहिद असे या ‘आयएसआय’ एजंटचे नाव असून तो बुलंदशहर येथील खुर्जा नगरचा रहिवासी आहे. मेरठ इथल्या लष्करी भागाची काही छायाचित्रे घेऊन ती पाकिस्तानला पाठवून जाहिद बुलंदशहराकडे परतत होता. २०१२ आणि २०१४ तो पाकिस्तानला जाऊनही आला आहे. त्याचे नातेवाईकही पाकिस्तानात राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांचे विशेष पथक या आयएसआय एजंटची चौकशी करीत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 12:30 pm

Web Title: suspected isi agent zahid arrested by police in bulandshahr
Next Stories
1 शबरीमला मंदिरात महिला प्रवेशाला समर्थन देणाऱ्या स्वामी संदीपानंद गिरींच्या आश्रमावर हल्ला
2 कर्तव्यापुढे वडिलांनाही क्षमा नाही, नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी ठोठावला दंड
3 राष्ट्रवादीचे माजी नेते तारिक अन्वर काँग्रेसमध्ये दाखल
Just Now!
X