X
X

जम्मू काश्मीरमध्ये पोलीस चेकपोस्टवर गोळीबार करुन दहशतवाद्यांचं पलायन

READ IN APP

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर झज्जर कोटली येथे हा हल्ला करण्यात आला

जम्मू काश्मीरमध्ये पोलीस चेकपोस्टवर दहशतवाद्यांनी गोळीबार करुन पळ काढला आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर झज्जर कोटली येथे हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दहशतवादी एका ट्रकमधून आले होते. हल्ला केल्यानंतर दहशतवादी उधमपूरच्या दिशेने पळाले. पोलिसांनी पाठलाग करत ट्रक ताब्यात घेतला आहे. ट्रकमधून एक एके रायफल आणि ३ मॅगजिन्स सापडल्या आहेत.चेकपोस्टवर तपासणीसाठी ट्रक थांबवला असता अचानक आतमधून गोळीबार सुरु झाला असं पोलीस अधिकारी विवेक गुप्ता यांनी सांगितलं आहे. पोलिसांनी ट्रकचालक आणि क्लीनरला ताब्यात घेतलं आहे. ट्रकमधून दोन ते तीन दहशतवाद्यांना पळ काढला असून त्यांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी परिसराला घेराव घातला असून सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.

23
X