News Flash

बंगालमधील पंचायत निवडणुकांत प्रचारासाठी भाजपकडून असीमानंद

स्वामी असीमानंद हे मूळचे बंगालच्या हुगळी जिल्ह्य़ाचे असून त्यांचे कुटुंब सध्या तेथे राहते

स्वामी असीमानंद

कोलकाता : मशीद बाँबस्फोट प्रकरणात अलीकडेच सुटका झालेले स्वामी असीमानंद यांना पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकांच्या प्रचारासाठी आणि नंतर राज्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी उतरवण्याची राज्य भाजपने तयारी केली आहे. स्वामी असीमानंद ऊर्फ नबकुमार सरकार हे मूळचे बंगालच्या हुगळी जिल्ह्य़ाचे असून त्यांचे कुटुंब सध्या तेथे राहते. आपले असीमानंद यांच्याशी आधीच  बोलणे झाले असून, त्यांनी राज्यात भाजपचा विस्तार करण्यात मदतीसाठी संमती दिली आहे, असे रा.स्व. संघाचे माजी प्रचारक असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी सांगितले.

मी असीमानंदांना फार पूर्वीपासून ओळखतो. मी त्यांच्याशी पूर्वी बोललो आहे. बंगालमधील परिस्थिती वाईट असून आपल्याला तेथे काम करायची आवश्यकता असल्याचे मी त्यांना सांगितले आहे. त्यांनी यासाठी संमती दिली आहे. आता त्यांची सुटका झालेली असल्यामुळे ते राज्यात आमच्यासोबत काम करतील. पंचायत निवडणुकांच्या काळात ते भाषणे करतील. त्याबाबतचे तपशील अद्याप ठरायचे आहेत, असे घोष यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. असीमानंद यांच्याकडे संघटनकौशल्य असून त्यांनी समाजासोबत अनेक वर्षे काम केले आहे. त्यांच्या या कौशल्याचा पक्षाला फायदा होईल, याचा घोष यांनी उल्लेख केला.

कायदेविषयक औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर असीमानंद लवकरच बंगालला भेट देतील, असे पक्ष सूत्रांनी सांगितले. प्रचाराच्या काळात असीमानंद यांनी बंगालच्या विविध ग्रामीण भागांत फिरून पक्षाच्या विचारसरणीचा प्रचार करावा अशी राज्य भाजपची इच्छा आहे.

‘निवडणूक हिंदू-मुस्लीम वादावर’

बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणूक रस्ते किंवा पिण्याचे पाणी यावरून लढली जात नाही तर हिंदू विरुद्ध मुस्लीम वादावरून लढली जाणार आहे असे वादग्रस्त वक्तव्य बेळगाव ग्रामीणमधील भाजप आमदार संजय पाटील यांनी केले आहे. माझ्या विरोधातील काँग्रेस उमेदवार जर मंदिर बांधू असे म्हणत असतील तर त्यांना मते द्या. मात्र तरीही त्या बाबरी मशीद उभारतील. ज्यांना मशीद, टिपू जयंती हवी असेल त्यां नी काँग्रेसला मते द्यावीत, असे पाटील यांनी म्हटले आहे. पाटील यांच्या विरोधात काँग्रेसकडून महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा लक्ष्मी हेबलीकर निवडणूक लढवत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 1:40 am

Web Title: swami aseemanand campaign for bjp during panchayat polls in bengal
Next Stories
1 ८६% टक्के ATM मशीन्स सुरु, रोकड नसलेल्या भागात पोहोचले पैसे
2 केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर विधि सल्लागाराचा आक्षेप!
3 अमित शाह यांच्याबाबतचे ‘सत्य’ भाजपासह सगळ्या जनतेला ठाऊक -राहुल गांधी
Just Now!
X