News Flash

विकिलीक्सच्या असांजला दिलासा; बलात्कार प्रकरणाचा तपास स्वीडनने थांबवला

सध्या असांज ब्रिटनमधील इक्वेडोरच्या दूतावासात आश्रयाला

विकिलीक्सच्या असांजला दिलासा; बलात्कार प्रकरणाचा तपास स्वीडनने थांबवला
विकिलिक्सचे संस्थापक जुलियन असांज

स्वीडनच्या सरकारी वकिलांनी जुलियन असांज यांच्याविरोधात सुरु असलेल्या बलात्कार प्रकरणाची चौकशी बंद केली आहे. यामुळे विकिलीक्सचे संस्थापक असलेल्या जुलियन असांज यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जुलियन असांज २०१२ पासून ब्रिटनमधील इक्वेडोरच्या दुतावासात आश्रयाला आहेत.

स्वीडनच्या सरकारी वकिलांनी जुलियन असांज यांच्याविरोधातील बलात्कार प्रकरणाचा तपास थांबवला आहे. ‘सरकारी वकिलांनी जुलियन असांजवरील बलात्कार प्रकरणाचा तपास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे स्वीडन सरकारने एका माहितीपत्रकाद्वारे म्हटले आहे. जुलियन असांज यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत. मात्र असांज यांनी त्यांच्यावरील आरोप कायम फेटाळले आहेत. २०१० मध्ये असांज एका व्याख्यानासाठी स्टॉकहोममध्ये गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते.

विकिलीक्सचे संस्थापक जुलियन असांज यांच्याविरोधातील बलात्कार प्रकरणाचा तपास बंद करण्याचा निर्णय स्वीडनने घेतला आहे. यासोबतच असांज यांच्याविरोधात जारी करण्यात आलेले वॉरंटदेखील रद्द करण्यात आले आहे. विकिलीक्सने ट्विटरवरुन याबद्दलची माहिती दिली आहे. जुलियन असांज यांच्या अटकेसोबतच त्यांच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्नदेखील स्वीडनकडून सुरु होते. मात्र आता बलात्कार प्रकरणाचा तपासच थांबल्याने असांज यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

स्वीडनला परतल्यास सरकारी यंत्रणा आपली रवानगी अमेरिकेला पाठवतील आणि सैन्य आणि गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक केल्याप्रकरणी खटला चालवण्यात येईल, अशी भीती जुलियन असांज यांना आहे. जुलियन असांज यांनी विकिलीक्सच्या माध्यमातून इराक, अफगाणिस्तान युद्ध आणि अमेरिकेशी संबंधित अनेक गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक केली होती. यानंतर जगभरात असांज प्रसिद्ध झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2017 5:11 pm

Web Title: swedish prosecutor drops rape probe against wikileakss founder julian assange
Next Stories
1 अमेरिकेतील विमानतळावर ताब्यात घेतलेल्या भारतीयाचा कोठडीत मृत्यू
2 भारतापेक्षा बांगलादेश, नेपाळ, भूतानची आरोग्य सेवा ‘बेस्ट’
3 मला घाबरवू नका, खुर्चीवरून खाली खेचेन; लालूप्रसादांची भाजपला धमकी
Just Now!
X