01 December 2020

News Flash

ट्रेनमध्ये सापडली १ कोटी ४४ लाखांची सोन्याची बिस्कीटं, मालक मात्र सापडेना; पोलीस म्हणतात…

आठ महिने शोध घेतल्यानंतर स्वित्झ पोलिसांनी जारी केलं पत्रक

प्रातिनिधीक फोटो

बस, ट्रेन किंवा टॅक्सीमध्ये एखादी वस्तू विसरणं ही खूपच सामान्य गोष्ट आहे. स्वित्झर्लंडमधील पोलिसही एका व्यक्तीचा शोध घेत आहे. ही व्यक्ती एका पाकीट ट्रेनमध्ये विसरली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या पोलिसांना सापडलेल्या या पाकिटामध्ये चक्क सोन्याची बिस्कीटं आहेत. या सोन्याची किंमत एक लाख ९० हजार डॉलर म्हणजेच भारतीय चलनामध्ये एक कोटी ४४ लाख ७७ हजारांहून अधिक आहे. हे पाकीट कोणाचं आहे यासंदर्भातील शोध आता पोलीस खात्याने सुरु केला असल्याची माहिती सीएनएनने दिलं आहे.

स्वित्झ फ्रेडल रेल्वेच्या ट्रेनमधील सामान ठेवण्याच्या कप्प्यामध्ये एका प्रवाशाला हे पाकीट आढळून आलं. सेंट गॅलन ते ल्युसेरेनी या प्रवासादरम्यान आढळलेलं हे पाकीट पोलिसांकडे मागील आठ महिन्यांपासून असल्याचे पोलीस खात्यातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीमधून उघडं झालं आहे. पोलीस खात्याने मागील आठ महिन्यांमध्ये हे पाकीट कोणाच्या मालकीचे आहे यासंदर्भात बराच तपास केला. मात्र या सोन्याचा मालक कोण आहे किंवा हे पाकीट ट्रेनमध्ये कोण विसरुन गेलं यासंदर्भात पोलिसांनी कोणतीही माहिती मिळालेली नाही. यासंदर्भातील अधिकृत पत्रक पोलीस खात्याने काही दिवसांपर्वीच जारी केलं आहे.

आठ महिन्यांपासून शोध घेऊन मालक सापडत नसल्याने तसेच कोणीही या सोन्यावर हक्क सांगण्यासाठी पुढे येत नसल्याने पोलिसांनी हे सोन खात्याच्या ताब्यात घेण्याच्या निर्णय घेतला आहे. मात्र पाच वर्षांपर्यंत या सोन्यावर हक्क सांगण्यासाठी देण्यात येणार आहेत. पुढील पाच वर्षांमध्ये मालकाने येऊन या सोन्यावर हक्क सांगून पुरावा सादर केल्यास हे सोनं त्या व्यक्तीच्या ताब्यात देण्यात येईल असं पोलिसांनी २ जून रोजी स्पष्ट केलं आहे. पोलिसांनी घोषणा केल्यानंतर काही जणांनी पोलीस खात्याशी संपर्क साधल्याची माहिती पोलीस प्रवक्त्यांनी सीएनएनला दिली आहे. मात्र या व्यक्तींबद्दल अधिक माहिती देण्यास प्रवक्त्यांनी नकार दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 2:10 pm

Web Title: swiss authorities search for the person who left one crore 44 lakh of gold bars on a train scsg 91
Next Stories
1 लॉकडाउनदरम्यानही अ‍ॅमेझॉनच्या जेफ बेझोस यांच्या संपत्तीत ४० अब्ज डॉलर्सची वाढ
2 सीतेने अग्निपरीक्षा दिली म्हणजे नेमकं काय केलं होतं?
3 व्हायरल फोटोमधील ‘ती’ चिमुकली आहे तरी कोण?
Just Now!
X