News Flash

मध्य प्रदेशात परदेशी महिलेवर सामुहिक बलात्कार

पर्यटनासाठी भारतात आलेल्या स्वित्झर्लंडमधील एका महिलेवर आठ अज्ञात व्यक्तींनी बलात्कार केल्याची घटना मध्य प्रदेशमध्ये उघडकीस आलीये.

| March 16, 2013 12:58 pm

 पर्यटनासाठी भारतात आलेल्या स्वित्झर्लंडमधील एका महिलेवर आठ अज्ञात व्यक्तींनी बलात्कार केल्याची घटना मध्य प्रदेशमध्ये उघडकीस आलीये. मध्य प्रदेशातील दातिया जिल्ह्यामध्ये ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
संबंधित महिला आणि तिचा नवरा हे सायकलवरून दातिया शहराजवळून जात असताना ही घटना घडली. ओर्छामधील राम मंदिर बघून ते दोघे शुक्रवारी संध्याकाळी परत येत होते. त्यावेळी आठ आरोपींनी त्या दोघांकडील मौल्यवान वस्तू आणि रोकड लुटली. त्यानंतर महिलेवर तिच्या नवऱयासमोर बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर महिलेला ग्वाल्हेरमधील कमलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे केलेल्या चाचण्यांनुसार तिच्यावर बलात्कार झाला असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिस संबंधित आरोपींचा कसून शोध घेताहेत. चौकशीसाठी त्यांनी काही जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून माहिती घेण्यात येते आहे. आरोपी दातियामधील जंगलामध्ये पळून गेले असण्याची शक्यता गृहित धरून तेथेही तपास पथके पाठविण्यात आली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2013 12:58 pm

Web Title: swiss woman gangraped by 8 men in madhya pradesh
Next Stories
1 सीआरपीएफ कॅम्प हल्ला: दहशतवाद्यांना अश्रय देणाऱयाला अटक
2 मातृभाषेचा विजय!
3 कोब्रापोस्ट स्टिंग: एचडीएफसीकडून चौकशीसाठी ‘डेलॉईट’ची नेमणूक
Just Now!
X