News Flash

मध्य प्रदेशमध्ये विदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार

बलात्काऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी प्रस्तावित कायद्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू असतानाच बलात्काराच्या घटना मात्र अव्याहत सुरूच आहेत. शनिवारी त्यात आणखी एका घटनेची भर

| March 17, 2013 12:11 pm

बलात्काऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी प्रस्तावित कायद्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू असतानाच बलात्काराच्या घटना मात्र अव्याहत सुरूच आहेत. शनिवारी त्यात आणखी एका घटनेची भर पडली. सायकलवरून भारतभ्रमण करण्यासाठी आलेल्या स्वित्र्झलडमधील एका महिलेवर तिच्या पतीसमक्ष सामूहिक बलात्कार केल्याची घटना मध्य प्रदेशातील दातिया जिल्ह्य़ात घडली. या प्रकरणी २० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आपद्ग्रस्त स्विस दाम्पत्य ऑरछा येथील राममंदिराचे दर्शन घेऊन आग्रा येथे जाण्यास निघाले होते. मात्र, रात्र झाल्याने दाम्पत्याने दातिया जिल्ह्य़ातील झरिया गावानजीक असलेल्या जंगलात आश्रय घेण्याचे ठरवले. रात्री नऊ वाजता सात-आठजणांनी त्यांच्यावर हल्ला केला. महिलेवर बलात्कार करून त्यांच्याकडील लॅपटॉप इतर किमती सामानही टोळक्याने पळवून नेले. या घटनेने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने जंगल परिसर पिंजून काढून या प्रकरणी २० जणांना ताब्यात घेतले. तसेच आठ अज्ञात लोकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, सामूहिक बलात्काराच्या या घटनेने मध्य प्रदेशातील राजकारण ढवळून निघाले आहे. विदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार होणे ही लांच्छनास्पद बाब असून आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्याची तसेच देशाचीही प्रतिमा मलीन झाली असल्याची टीका काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अजयसिंह यांनी केली.
इंदूरमध्ये विवाहितेवर खासगी बसमध्येच सामूहिक बलात्कार
दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणाची घटना ताजी असतानाच एका ३८ वर्षांच्या विवाहितेवर खासगी बसमध्येच चालक, वाहकासह तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना येथे घडली. पोलिसांनी या प्रकरणी बसचा चालक झाहीद (३०), वाहक लाला (२२) आणि राजेश (२५) यांना अटक केली आहे. सदर पीडित महिलेचे घरात पतीशी भांडण झाल्याने ती संतापाच्या भरात घरातून बाहेर पडली होती. देवास येथे ती या बसमध्ये बसली. बस इंदूर येथे आल्यावर महिलावगळता सर्व प्रवासी खाली उतरले आणि त्यानंतर तिघांनी तिच्यावर बसमध्येच बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 12:11 pm

Web Title: swiss woman tourist gangraped in madhya pradesh 20 detained
Next Stories
1 बँकांकडून ‘काळ्या धंद्या’ची चौकशी सुरू
2 दिशादर्शक प्रणाली असलेला उपग्रह ‘इस्रो’ जूनमध्ये सोडणार
3 ‘टाइम’ संपादकपदी बॉबी घोष नियुक्त
Just Now!
X