News Flash

‘त्या’ विदेशी तबलिगींना तोपर्यंत व्हिसा नाही; सरकारचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

सरकारच्या निर्णयाविरोधात तबलिगी समाजाकडून सुप्रीम कोर्टात याचिका

तबलिगी मरकज मध्ये सहभागी झालेल्या २६०० पेक्षा जास्त तबलिगींना त्यांच्या देशात जाता येणार नाहीये. केंद्र सरकारने त्यासंदर्भातलं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलं आहे. त्यानुसार भारतातील ज्या राज्यात तबलिगींविरोधात खटले सुरु आहेत ते संपेपर्यंत त्यांना भारत सोडता येणार नाही. गेल्या सुनावणीत न्यायालयाने केंद्र सरकारकडून या प्रकरणी उत्तर मागितलं होतं आणि सुनावणी २ जुलैपर्यंत पुढे ढकलली होती. आता या प्रकरणी केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात सादर केलं आहे.

केंद्र सरकारने प्रतिज्ञा पत्रात काय म्हटलं आहे?
करोना काळात भारत सरकारने दिलेले निर्देश आणि राज्य सरकारांनी तसंच पोलिसांनी दिलेले आदेश यांचं उल्लंघन केल्याचे गुन्हे तबलिगी समाजातील नागरिकांवर आहेत. विविध राज्यांमध्ये हे गुन्हे दाखल आहेत. त्यांची सुनावणी होणे अद्याप बाकी आहे. केंद्र सरकारने तबलिगी जमातच्या हजारो जणांना काळ्या यादीत टाकलं असून त्यांचा व्हिसा रद्द केला आहे. त्यामुळे या प्रकरणांची सुनावणी होईपर्यंत विदेशातून जे तबलिगी भारतात आले आहेत त्यांना आपला देश सोडता येणार नाही.

दरम्यान तबलिगी समाजाने सरकारच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या आहेत त्यावरची सुनावणी १० जुलै ला होणार आहे.

आत्तापर्यंत २६७९ तबलिगींचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. २७६५ जणांना काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे. २०५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९०५ फरारी तबलिगींविरोधात लुक आऊट नोटीसही लागू करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 6:10 pm

Web Title: tabligh members cant be deported unless criminal trial completed centre tells sc scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 …तर अनिल अंबानी जाऊ शकतात तुरूंगात; माहिती देण्याची तारीख आली जवळ
2 करोना रुग्णांवरचं संकट टळलं; डॉक्टरांच्या सामूहिक राजीनाम्यानंतर झुकले कर्नाटक सरकार, दिली वेतनवाढ
3 चीनशी तणातणी सुरू असतानाच भारत रशियाकडून खरेदी करणार ३३ फायटर जेट
Just Now!
X