News Flash

मुंबई हल्लाप्रकरणी राणाच्या प्रत्यार्पणास अमेरिका अनुकूल

राणा हा आता ५९ वर्षांचा असून त्याला भारताने फरारी घोषित केले आहे.

वॉशिंग्टन : पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती तहव्वुर राणा हा २००८ च्या मुंबई हल्ल्याच्या कटात सामील होता.  त्याला ताब्यात देण्याची भारताची विनंती मान्य करून त्याचे प्रत्यार्पण करावे, अशी भूमिका बायडेन प्रशासनाने लॉस एंजलिसच्या संघराज्य न्यायालयात स्पष्ट केली आहे.

राणा हा आता ५९ वर्षांचा असून त्याला भारताने फरारी घोषित केले आहे. त्याच्यावर २००८ च्या मुंबई हल्ल्याप्रकरणी अनेक आरोप आहेत. त्या हल्ल्यात सहा अमेरिकनांसह १६६ जण ठार झाले होते. त्याला १० जून २०२० रोजी लॉस एंजलिस येथे अटक करण्यात आली होती. त्याला ताब्यात देण्याची मागणी भारताने केली होती. अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयात युक्तिवाद करताना असे सांगण्यात आले की,  प्रत्यार्पणाचे सर्व निकष पूर्ण होत असून न्यायालयाने राणा याला भारताच्या ताब्यात देण्यास मंजुरी द्यावी. भारताने दिलेल्या पुराव्याआधारे असे सांगण्यात आले की, राणा याने काही बनावट कागदपत्रे तयार केली होती. राणा हा  भारताला हवा असून त्याच्याविरोधात ऑगस्ट २०१८ मध्ये अटक वॉरंट जारी केले होते.

भारतीय अधिकाऱ्यानी म्हटले आहे की, राणा हा लष्कर ए तयबाचा दहशतवादी डेव्हीड कोलमन हेडली याचा बालपणीचा सहकारी असून त्याने २००८ मध्ये मुंबई हल्ल्याचा कट करण्यात  महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 12:05 am

Web Title: tahavur rana canadian businessman pakistani descent akp 94
Next Stories
1 Pegasus Spyware : “…हे काम संजय राऊतांनी बंद करावं”, फडणवीसांचा खोचक सल्ला!
2 “तुम्ही काय मला सांगता महाराष्ट्र…” म्हणत संजय राऊत राज्यसभेत मोदी सरकारवर संतापले!
3 “त्या दिवशी मला टाळी-थाळीचं महत्त्व समजलं”; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्यसभेत सांगितली आठवण!
Just Now!
X