27 September 2020

News Flash

Taiwan: तैवानने चीनच्या दिशेने चुकून डागले मिसाईल!

तांत्रिक त्रुटीमुळे चीनच्या दिशेने मिसाईल डागले गेल्याचे स्पष्टीकरण तैवानच्या नौदल अधिकाऱयाने दिले

तैवानने डागलेले मिसाईल हे ३०० किमी अंतराची क्षमता असेलेले होते.

तैवानच्या नौदल विभागाकडून शुक्रवारी चीनच्या दिशेने चुकून एक ‘सुपरसॉनिक अँटी शिप मिसाईल’ डागले गेले. तैवानमधील सत्ताधारी पक्षाच्या ९५ व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नौदलाचा खास कार्यक्रम सुरू असताना हा प्रकार घडला. तैवानच्या एका युद्धनौकेवरून चीनच्या दिशेने मिसाईल डागले गेले. तैवानकडून निष्काळजीपणात घडलेल्या या दुर्घटनेत एका मच्छिमाराचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत.
तांत्रिक त्रुटीमुळे चीनच्या दिशेने मिसाईल डागले गेल्याचे स्पष्टीकरण तैवानच्या नौदल अधिकाऱयाने दिले आहे. यासोबत घडलेल्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचेही अधिकाऱयांनी सांगितले. तैवानने डागलेले मिसाईल हे ३०० किमी अंतराची क्षमता असेलेले होते. कार्यक्रम सुरू असताना ते चुकून चीनच्या दिशेने डागले गेले. मात्र, ते पूर्ण क्षमतेनुसार आपले अंतर निश्चित करू शकले नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पण नौदलाच्या तळापासून ७५ किमी अंतरावर असलेल्या एका मच्छिमाराच्या बोटीच्या बाजूला हे मिसाईल कोसळले आणि बोटमालक मच्छिमाराचा मृत्यू झाला. मिसाईल ऑपरेटरकडून योग्य पद्धतीचा पाठपुरावा न केला गेल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक माहितीनुसार समोर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 3:24 pm

Web Title: taiwan mistakenly fires supersonic missile towards china kills 1 fisherman
Next Stories
1 उत्तराखंडमध्ये ढगफुटी, ३० जणांचा बळी, घरे वाहून गेली
2 VIDEO : ‘तेजस’ची थक्क करणारी भरारी…
3 ‘तेजस’ आज हवाई दलात दाखल, जाणून घ्या १० महत्त्वपूर्ण गोष्टी
Just Now!
X